राळेगाव तालुका परिसरातील इलेक्ट्रॉनिक काट्यातुन होतेय सर्वसाधारण लोकांची लुट
साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ -राळेगाव:- पूर्वी चालणारे जुने वजन मापे इतिहास जमा झाले असून आता लहान मोठ सर्वच दुकानात इलेक्ट्रॉनिक काटे वापरत आहेत. मात्र या आकड्यात व्यापारी बनवाबनवी करून ग्राहकांची लुबाडणूक करीत असल्याचे वास्तव्य पुढे आले आहे नवीन तंत्रज्ञानाचे इलेक्ट्रॉनिक काटे दुकानदाराकडे आल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना असा विश्वास वाटत होता कि, इलेक्ट्रॉनिक खात्याने खरेदी केलेली सामग्री कमि मिळणारच नाही आणि शेतकऱ्यांना खात्याने वजन करून माल विक्री केली आहे. व्यापारी जास्त घेऊच शकत नाही मात्र काही दिवसापूर्वी पासून शेतकरी व सर्वसामान्यानमध्ये एकच चर्चा आहे कि घरून 100 किलो असलेल्या माल मोजून विक्री करायला नेले पण इलेक्ट्रॉनिक्स काट्यावर मोजले असता ते 96 किलोच भरले, एका व्यक्तिने दुकानातून 20 किलो साखर खरेदी केली पण घरी मोजल्यावर 100 ग्रॅम साखर कमी भरल्याचे दिसून आले. एका व्यक्तीने 150 किलो लोखंडी रॉड (छड)खरेदी केली पण गावातच दुसऱ्या काट्यावर मोजले असता 3 किलो कमी भरल्याचे सांगण्यात येते, इलेक्ट्रॉनिक्स काट्याच्या संबंधात प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. माल खरेदी करणाऱ्या दुकानदाराचे काटे आणि माल विक्री करणाऱ्या दुकानदाराचे काटे व्यपाऱ्यांच्या हितात सेटिंग केले असल्याचे जाणवते. त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक्स काट्यांची प्रशासनाने चौकशी केल्यास मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, वजन,माप करणाऱ्या विभागाने अशा प्रकारच्या एकही कार्यवाहि केली नसल्याने संबंधित विभागाचे अधिकारी कर्मच्यारी तर या रॅकेट मधी सहभागी नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे इलेक्ट्रॉनिक्स काट्यामुळे व्यापाऱ्यांची पोल खुलणे सुरु झाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स काट्याची हेराफेरी करून रॅकेटदेखील सक्रिय झाले असून प्रत्येक दुकानदार व व्यापाऱ्याला घर पोच सेवा देऊन व्यापाऱ्याच्या इछेप्रमाणे काट्याची हेराफेरी करून देतात. काट्यात हेराफेरी करून देण्याचा दर प्रति काटा 500 रुपयापासून 5 हजार रुपया पर्यंत असल्याचे सांगण्यात येते. पकडमध्ये येऊ नये मनून वेगळी स्विच व रिमोट कंट्रोल वर हाताळन्याची सोय होते. अशीही माहिती आहे इलेक्ट्रॉनिक्स काट्याच्या हेराफेरी मुळे शेतकऱ्याचे मोठया प्रमाणात फसवणूक होत आहे व गृहउपयोगी वस्तूखरेदी करणाऱ्या आर्थिक भृदंड बसत आहे.