तंत्रज्ञानांच्या युगात व्यसन करणाऱ्यांचे प्रमान वाढले; राळेगाव तालुक्यातील पुरुष व्यसनाधीन वाढ.

53

तंत्रज्ञानांच्या युगात व्यसन करणाऱ्यांचे प्रमान वाढले; राळेगाव तालुक्यातील पुरुष व्यसनाधीन वाढ.

In the age of technology, the number of addicts has increased; Male addiction in Ralegaon taluka.
साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ:- तंबाखूमुळे कॅन्सर होतो असे कितीही इशारे वैज्ञाणिकाने दिले असले तरी तंबाखुचे सेवन करणाऱ्यान ची सवय सुटायला तयार नाही. उलट तंबाखू सेवनाचे नवेनवे प्रयोग तंत्रयुगात विकसित होत असून गुटखा खाण्याची लत लागलेल्या शौकीनांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानात खरा घोटून देणारी मशीन अनेक पानटपरीवर दिसायला लागली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानात खरीची चव घेण्यास नवी पिढी गुंग झाली आहे. तंबाखू गुटख्याच्या नादी लागलेले अनेक वर्षा पूर्वी रत्नाच्या प्रेमात आंकंठ बुडून राहायचे,  परंतु कालांतराने विमलने या प्रेम प्रकरणात उडी घेतल्याने तंबाखूचा त्रिकोण बराच काळ गाजला. काही तंबाखू प्रेमींनी सीतार हाती घेत थेट गोव्याची सहल करून आपले गुटखा प्रेमी सिद्ध केले. यात काही उच्चभ्रू उचिपसंद खाण्याचाही समावेश होता खिशाला परवडत नाही मनून आपली तलप भागविण्यासाटी विविध प्रकार च्या तंबाखूचे ब्रँड बाजारात आलेत. त्यानंतर तंबाखूपासून निर्मिती झाली व गुटख्याचा जन्म झाला.

पानटपरीत ग्राहकांची संख्या  वाढत आहे. त्यामुळे खरा घोटून देतांना होणारी दमछाक थांबविण्यासाठी पानटपरी चालकानीं अनेक नवीन उपकरनांना जन्म दिला. आता खर्रा घोटण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावलेली आधुनिक मशीनच उपलब्ध झाली आहे. यापूर्वीच शासनाने खेड्यापासून तर शहरापर्यंत गुटखा खाणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली व त्या पासून होणारे कॅन्सरचे अनेक आजार होत असल्याने शासनांनी गुटखा बंदीचा निर्णय जाहीर केला. परंतु गुटखा तर बंद झालाच नाही तो नव्या रूपात आणि काळ्या बाजाऱ्याच्या माध्येमातुन शौकीनांनच्या सेवेत हजर झाला. या गुटख्याची किक आता पूर्वीपासून राहिली नसून पानटपरी वरील घोटलेला खर्रा खाण्याची क्रेझ नव्या पिढीत रुजू झाली आहे. आता खरा घोटून देणारी मशीन बाजारात दाखल असून तंत्रज्ञाणि खऱ्याची चव घेण्यास नवी पिढी गुंग झाली आहे. असे मनाला हरखत नाही.