महिला दिनानिमित्त प्रतिकुलतेवर मात केलेल्या नाशिकच्या भगिनीं मीना आढाव.
नाशिक,दि. 8 मार्च:- सिन्नरच्या प्रभाकर आढाव यांच्याशी विवाह झाल्यानंतर मीना आढाव या बरीच वर्ष गृहिणी म्हणून आपल्या परीवाराची देखभाल करीत होत्या. पती एका पेपर मिलमध्ये कार्यरत होते. मुले हायस्कूलमध्ये असतानाच अचानक हृदयविकाराने पतीचे निधन झाले.
पतीचे निधन झाले त्यांमुळे त्या पुर्णत टूटल्या होत्या. त्यात घरची परस्थिती हलाखीची. मग मीना आढाव यांनी ठरवल आपल्या परीवारासाठी काही पण करायच आणि आपल्या मुलांना एक चांगले व्यक्ती आणि चागंले शिक्षण देणारच हा मानस मनात निर्माण करुन लहान मुलगा आणि दोन्ही मुलींच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी मेस सुरू केली. दररोज किमान 20 डब्यांचा स्वयंपाक करून त्यातून घर चालवले. एकीकडे सुरतहून कपड़े आणून कपड़े विक्रीचा व्यवसायाद्वारे मुलांच्या शिक्षणात कसलीही उणीव राहू नये, याची दक्षता घेतली. त्यांचा एक मुलगा फूड टेक्नोलॉजी इंजिनिअर, एक कन्या मेकॅनिकल इंजिनिअर तर मोठ्या कन्येस एम. एस्सीपर्यंत शिकवण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलून दाखवले.
या महिला दिना निमित्ताने या कर्तुत्ववान भगिनींला मानाचा मुजरा.