पत्रिका तर मिळाली; पण लग्नाला जायचे की नाही !
कोरोनाचा शासनाने ठरुन दिलेल्या नियमांमुळे नातेवाईकांत संभ्रम.
✒साहिल महाजन यवतमाळ प्रतिनिधी✒
यवतमाळ, दि.8 मार्च:- कोरोना वायरस लोकांना स्वस्त बसू देत नाही आहे त्याच्या भयाने चिंतेत दिवस ढकलावे लागत आहे. ज्यांच्या घरात लग्नाचे कार्यक्रम ठरले आहे त्यांच्या पुढे नाना अडचणी येत आहे. सोबतच यजमानांनी आपल्या नातेवाईक परिचित यांना निमंत्रित केले आहे. मात्र त्यांच्यापुढे लग्नाला यायचे की नाही, या प्रश्नाने ग्रासले आहे. कारण 50 हुन अधिक लोकांची उपस्थित लग्नकार्यात नको, ही प्रशासकीय व्यवस्थेने घालून दिलेली अट आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर नंतर दिवाळी सर्व व्यवहार पूर्वी प्रमाणे सुरु झाले, सोबतच लग्न जोडणीला वेग आला. निमंत्रणाच्या चारशे -पाचशे पत्रिका बाहेरगावी पाठविल्या गेल्या. सोबतच गावातही वाटल्या. लग्न धुमधडाक्यात सतराशे- अठराशे लोकांच्या उपस्थितीत मस्त पैकी करू याचा वर आणि वधू दोंनी घरात आनंद ! त्यात कोरोना वायरस चे परत विघ्न आणि सारेच गणित बिगडले मंगल कार्यालय कॅटरर्स ऍडव्हान्स पैसे दिले. कपडे सोने दागिन्यांची खरेदी झाली. पण जाचक नियमानुसार 50 संख्येत लग्न कसे पार पाडायचे, ही चिंता सामान्यांना सतावू लागली आहे.