सिद्धांत
८ मार्च, मुंबई: आज भारतीय महिला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान क्षेत्रात पुरुषांशी केवळ बरोबरीचं नव्हे तर त्यांच्याहीपेक्षा अधिक यशस्वी आणि कुशल बनल्या आहेत. कधीकाळी फक्त चूल – मुलं यामध्येच राहणाऱ्या स्त्रिया आज मोठी हॉटेल्स, शिक्षणसंस्था चालवत आहेत. दुचाकी,चारचाकी, ट्रेन ते अगदी अवकाशयानातून अंतराळापर्यंतची सफर करत आहेत.

पण परिस्थिती नेहमीच अशी नव्हती. काही महिलांनी आपल्या अथक जिद्दीच्या जोरावर महिलांना निषिद्ध मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात प्रथमच सहभागी घडवून इतिहास घडवला आणि भविष्यातील महिला पिढीला प्रगतीची दारे उघडी करून दिली. प्रथम महिला पायलट? प्रथम महिला डॉक्टर? प्रथम महिला रिक्षाचालक? प्रथम महिला सैनिक? कोण होत्या या महिला? कसा होता त्यांचा प्रवास? चला जाणून घेऊ.

आनंदीबाई गोपाळराव जोशी आणि कादम्बिनी गांगुली – पहिल्या महिला डॉक्टर


पुण्याच्या आनंदीबाई जोशी आणि बंगालच्या कादंबिनी गांगुली या दोन्ही स्त्रिया १८८० च्या दशकात वैद्यकीय शिक्षण घेऊन पहिल्या महिला डॉक्टर बनल्या होत्या. आनंदीबाई जोशी यांनी अमेरिकेतील फिलाडेल्फिया तर कादंबिनी गांगुली यांनी कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधून डॉक्टरकीची पदवी घेत, महिलांसाठी वैद्यकीय क्षेत्र खुले केले.

शीला डावरे – पहिल्या महिला रिक्षा चालक


रिक्षा किंवा टमटम भारतीयांच्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. आजही या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण नगण्य स्वरूपात आढळून येते. पण रिक्षा चालक शीला डावरे मात्र या क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून जास्त कालावधीपासून कार्यरत आहेत. कधीकाळी केवळ महिला असल्याने कुणी रिक्षा चालवण्याची परवानगी न मिळणाऱ्या शीला डावरे आज आपल्या पती शिरीष कांबळे यांच्यासह एक ट्रॅव्हल कंपनी चालवतात. महिला प्रवाश्याना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून त्या अधिकाधिक महिला चालकांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन करतात.

आरती सहा – पहिल्या भारतीय महिला जलतरणपट्टू


मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या आरती सहा यांनी २९ सप्टेंबर १९५९ रोजी इंग्लिश खाडीला पोहून पार करत, अशी कामगिरी करणाऱ्या पहिला भारतीय आणि आशियायी जलतरणपट्टूचा मान पटकावला. त्यांच्या या विक्रमी कामगिरीमुळे भारत सरकारने १९६० साली त्यांना पद्मश्री पुरस्कार आहात केला. क्रीडा क्षेत्रातील पदमश्री पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या.

सरला ठकराल: पहिल्या भारतीय वैमानिक


वयाच्या २१ व्या वर्षी वैमानिक बनण्याचे प्रशिक्षण पूर्ण करून विमान चालवण्याचे लायसन्स मिळवण्याचा विक्रम सरला ठकराल यांनी केला होता. लायसन्स मिळवल्यानंतर एक हजार तास उड्डाणवेळ पूर्ण करून कौशल्याचे “A” सर्टिफिकेटही त्यांनी मिळाले होते.

प्रिया झिंगन – पहिल्या भारतीय महिला सैनिक


प्रिया झिंगन या भारतीय सैन्यदलात प्रवेश मिळवणाऱ्या पहिल्या महिला ( महिला कॅडेट १ ) होत्या. १९९३ साली भारतीय सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या २५ महिलांच्या गटातून रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रिया झिंगन यांनी पुढची १० वर्षे भारतीय सैन्यामध्ये आपली सेवा दिली.

हे आपण वाचलंत का? – महिला दिन विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here