" थांबवा रे बाबा युद्ध "

 

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

कवीता : –

थांबवा रे बाबा युद्ध “

" थांबवा रे बाबा युद्ध "

का अशी तुझी हरपली माणसा शुद्ध, माणुसकीला वाचवा थांबवा रे बाबा युद्ध !

निरपराध मेले येथे नसतांना काही गुन्हा, प्रेम सद्भावनेचा आता फुटू द्या रे पान्हा !

देशाने देशाशी मित्रतेने वागावे,
प्रत्येकाने जगतांना बंधुतेला जागावें !

उध्वस्त करून शहरे सांगा काय मिळणार ? वर्तमानच भविष्यास
वाटे आता गिळणार !

तरुण, बाल, वृद्धांचा काय होता कसूर, पसरलेला निर्दयतेचा चहुकडेच धूर !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here