सावलगाव येथे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन
✍क्रिष्णा वैद्य✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
9545462500
ब्रम्हपुरी : – ब्रम्हपुरी तालुक्यातील सावलगाव येथे जिल्हा निधीतून सिमेंट काॅंक्रीट रस्ता मंजूर झाला. सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या हस्ते संपन्न झाले.
सावलगाव येथे प्रल्हाद धोटे ते धनिकराम ढोंगे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्याची नितांत आवश्यकता असल्याने तशी मागणी सावलगाव येथील नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य क्रिष्णा सहारे यांच्या कडे केली होती. त्याअनुषंगाने जि.प. सदस्य क्रिष्णा सहारे यांनी विशेष प्रयत्न करून सदरचे काम मंजूर करून घेतले.
भुमीपुजन प्रसंगी अतीथी म्हणून पंचायत समिती सदस्या सुनंदाताई ढोरे, चिंचोली येथील सरपंच गजानन ढोरे, बोरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच रूपेश मैंद,शाम बावनकूळे सुरबोडी, सावलगाव येथील सरपंचा सौ. पौर्णिमाताई पचारे, उपसरपंच गोपाल कार, औराशे ग्रामसेवक, ग्रा.पं. सदस्य संतोष वाघधरे, राजू मेश्राम ग्राम. सदस्य सावलगांव, सौ. रोशनी बगमारे ग्रा.पं.सदस्य सावलगांव,
सौ उज्वला तलमले ग्राम. सदस्य सावलगांव, सौ. तेजस्विनी तलमले ग्राम. सदस्य सावलगांव, यशवंत तलमले पो.पा. सावलगांव, देवचंद तलमले तंटामुक्ती अध्यक्ष सावलगांव, मा. वैजेनाथ बगमारे सेवा सह. संस्था अध्यक्ष,मा. तुळशीदास पुरी से. मु.सावलगांव,मा. नंदलाल संभाजी कार, मा. पांडुरंग ढोंगे,मा. ज्ञानेश्वर पुरी, मा. संतोष ढोंगे, मा . रुपेश राऊत, मा. चेतराम तलमले, मा. कुंदन तलमले, वैभव ढोंगे, आणि गावकरी उपस्थित होते.