महिला संघांमध्ये रंगला कबड्डीचा सामना ……
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने पं.स.लाखनी तर्फे आयोजन
✍मुकेश मेश्राम ✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष , पं.स. लाखनी यांच्यावतीने कनेरी (द.) ता.लाखनी येथे तालुका स्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.उमेद महिला बचत गट व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) बचतगटातील महिला या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने , जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ,गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पंचायत समिती लाखनीकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.यामध्ये शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन , सार्वजनिक स्वच्छता कार्यक्रम ,विधवा महिलांसाठी कायदेशीर मार्गदर्शन , अंगणवाडीमध्ये आरोग्यविषयक जन जागृती ,बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूचे विक्री, प्रदर्शनी,आरोग्य पोषण दिवस , सकस पोषण आहार स्पर्धा,किशोर वयीन मुलींसाठी आरोग्य व स्वच्छता कार्यक्रम , सेनेटरी नॅपकिन चा वापर व व्यवस्थापन बद्दल उमेद मार्फत कार्यशाळा ,महिला उत्पादक समूह मार्फत धान लागवड प्रक्रिया , अन्न सुरक्षा सूक्ष्म उद्योग माहिती व इतर कार्यक्रमांचा समावेश आहे.याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर कबड्डी सामन्याचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
• आरोग्य जनजागृती साठी कबड्डी सामन्याचे आयोजन
लाखनी तालुक्यात , जिल्हा परिषदेचे उमेद महिला बचत गट व माविम च्या महिला बचतगटांचे मोठे जाळे कार्यरत आहे.या बचतगटांमध्ये सुमारे सतरा हजार पेक्षा जास्त महिला सहभागी असून , उपजीविकेसाठी विविध प्रयत्न करत आहेत.या महिला शासनाच्या इतर विविध उपक्रमांमध्ये देखील सहभागी होत असतात.या महिलांना क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने , व्यक्त होण्याची संधी मिळावी तसेच खेळाच्या निमित्ताने , त्यांच्यात आरोग्याच्या बाबत जागृती निर्माण व्हावी , यासाठी कबड्डी सामना आयोजित करण्यात आला होता.
उमेद च्या सविता तिडके यांचा पुढाकार
या कबड्डी सामन्याचे सर्व नियोजन तालुका अभियान व्यवस्थापक सविता तिडके यांनी उत्कृष्टरित्या केले.कोरोना प्रतिबंधक लसीकरणात तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद केडर , बचतगटातील महिला यांनी प्रभावी काम केले आहे.
उमेद ने जिंकला सामना
हा कबड्डी सामना , उमेद बचगटातील महिला व माविम बचगटातील महिला या दोन संघां दरम्यान झाला.उमेद संघाने हा सामना १४ गुणांच्या फरकाने जिंकला.ग्रामस्थांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकप्रतिनिधींचे प्रोत्साहन
या कार्यक्रमासाठी विद्याताई कुंभरे ( जि.प. सदस्य पोहरा), अश्विनीताई मोहतुरे ( पं.स.सदस्य कनेरी) , गणपती पांडेगावकर (मंडळ कृषी अधिकारी पालांदुर), जयंतजी बिनझाडे ( सरपंच कनेरी), तुलसीदास बांते( ग्रा.पं. सदस्य), यांनी उपस्थित राहून महिला खेळाडूंना प्रोत्साहन दिले. श्री.रमेश रामटेके , रेखाताई मते (अध्यक्ष- संगम प्रभागसंघ पोहरा),वंदना भिवगडे (माविम व्यवस्थापक- झेप CMRC), तसेच सर्व प्रभाग समन्वयक, सर्व व्यवस्थापक, सर्व उमेद कॅडर व समुह सदस्य आणि माविम सयोंगीनी आणि समुह सदस्य यावेळी उपस्थित होते. असे डॉ.शेखर जाधव.
गटविकास अधिकारी , यांनी कळविले आहे.