स्मार्ट ग्राम स्पर्धेत पिंपळगाव तालुक्यात प्रथम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

स्मार्ट ग्राम स्पर्धेत पिंपळगाव तालुक्यात प्रथम

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

स्मार्ट ग्राम स्पर्धेत पिंपळगाव तालुक्यात प्रथम जिल्हाधिकारी यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखनी : पिंपळगाव/सडक ग्रामपंचायतीने सौरऊर्जेचा योग्य वापर आणि घनकचरा व्यवस्थापनात योग्य ती कामगिरी केल्याने आर्थिक वर्षात २०२०-२१ च्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केला. त्यानिमित्त जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मन यांच्या हस्ते पुरस्कारस्वरूप १० लाख रुपयाचा धनादेश, सन्मानपत्र देऊन सरपंच संगीता उईके व ग्रामविकास अधिकारी मनोज राजाभोज यांना सन्मानित करण्यात आले.
११ सदस्यीय पिंपळगाव/ सडकची लोकसंख्या अंदाजे ३ हजार ५०० आहे. ग्रामविकास अधिकारी मनोज राजाभोज, सरपंच संगीता उईके , ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य बाळा शिवणकर यांच्या मार्गदर्शनात गावात अनेक विकास योजना राबवून गावाचा कायापालट करण्यात आला. सांडपाण्याचे योग्य नियोजन, घनकचरा व्यवस्थापन आणि सौरऊर्जेच्या वापरास गावकऱ्यांना प्रोत्साहित करून स्मार्ट ग्राम स्पर्धेत भाग घेतला. मोहाडी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तालुका स्तरीय समितीने निरीक्षण करून पिंपळगाव/सडक ग्रामपंचायतीची तालुक्यातून प्रथम क्रमांकाने निवड केली. जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कोवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच संगीता उईके, ग्रामविकास अधिकारी मनोज राजाभोज यांनी पुरस्कार स्वीकारला. यासाठी उपसरपंच उमेश कमाने, ग्रामपंचायत सदस्य बाळा शिवणकर, अविनाश कमाने, धनलाल खांडेकर, रवींद्र मसराम, ग्रामपंचायत सदस्या नम्रता दोनोडे, भुमेश्वरी कमाने, नाशिक दिघोरे, अनुरथा दोनोडे, ललिता लांजेवार, यशोधरा मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप मेश्राम, ओमदेव लांजेवार, राधा सोनवाने, किशोर कावळे व रवी नवखरे यांच्यासह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.