मंत्रतंत्राने उपचार करणाऱ्या ढोंगी देवीचा भंडाफोड

मंत्रतंत्राने उपचार करणाऱ्या ढोंगी देवीचा भंडाफोड

मंत्रतंत्राने उपचार करणाऱ्या ढोंगी देवीचा भंडाफोड

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱

लाखणी/ पवनी :-तालुक्यातील ईटगाव पुनर्वसन येथील महिला मैनाबाई मारबते ही अंगात देवीदेवता आणल्याचे भासवून लोकांवर खोटे नाटे उपचार करून फसवत होती.महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर या ढोंगी महिलेचा भंडाफोड करण्यात आला. या प्रकरणी अडयाळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून सदर ढोंगी देवीला अटक करण्यात आली आहे.
अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईटगाव (पुनर्वसन) येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या अंगात वाघीण, भोलेबाबा ह्या देवीदेवता आल्याचे भासविणारी मैनाबाई मारबते ही दरबार भरवून रोगमुक्त होण्यासाठी राख, लिंबू तंत्र मंत्र करून देत होती. जादूटोणा करणाऱ्याचे नाव सांगून समाजात भांडणे निर्माण करून आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाऱ्याकडे प्राप्त झाली. त्यानुसार समितीच्या वतीने कार्यकर्ते पाठवून पूर्ण माहिती घेतली असता हा प्रकार खरा असल्याचे आढळून आले.
५ मार्च २०२२ ला महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते दशरथ महादेव शहारे, चंद्रशेखर भिवगडे, विष्णुदास लोणारे, पुरूषोत्तम गायधने यांनी नाबाई रतिराम मारबते यांच्या दरबाराला भेट दिली. त्यावेळी रायपूर, नागपूर तसेच अनेक खेडयापाडयातून आलेल्या महिला व पुरूषांची गर्दी होती. त्यावेळी दशरथ शहारे यांनी आपली आकत लावली. शहारे यांना देवीने विचारले काय झाले तुला? कशासाठी आला? तेव्हा शहारे यांनी सांगितले की माय मला चक्कर आल्यासारखे लागते, तब्येत बरोबर राहत नाही त्यावेळी मैनाबाईने संपूर्ण अंग हलवून जोरजोरात आरडाओरडा करून भीती वाटेल असे कृत्य करून शहारेच्या अंगावरुन लिंबू उतरवून उपचार केले. तुला भूतबाधा झाली आहे कुणीतरी जादूटोणा केला आहे असे सांगितले.
यावेळी मअंनिसचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी मैनाबाईला प्रश्न विचारले की मी कोण आहे माझे नाव काय आहे? तेव्हा मैनाबाईने उत्तर दिले नाही तसेच शहारे यांनाओळखले नाही. त्यावेळी लोणारे यांनी मैनाबा ईला सांगितले की आपण ढोंग करून जनतेची फसवणूक करीत आहात. लोकांना भीती दाखवित आहात.असे म्हणताच मैनाबाईच्या अंगात येणारे वाघदेव, भोलेबाबा निघून गेले. अडयाळ पोलीस स्टेशनचे पी.एस. आय हरिचंद्र हिंगोले, पोलिस शिपाई संदीप नवलखेले, पोलीस हवालदार एकनाथ जांभुळकर, नितेश घोनमोडे, होमगार्ड काटेखाये, मेश्राम, महिला होमगार्ड लंबोधरी चव्हाण, जाधव यांनी मोका चौकशी केली.
स्वत:च्या अंगात अतिंद्रिय शक्तीचा शरीरातील संचाराचा दावा करून भीती धमकी व फसवणूक केल्या प्रकरणी मैनाबाई मारबते हिच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रातबंध व उच्छाटन कायद्याच्या कलम ३(२) नुसार कारवाही करून अटक करण्यात आली.