शिवाजी क्रीडा संकुलात महिलांसाठी झुंबा व एरोबिक्सवर थिरकल्या महिला

शिवाजी क्रीडा संकुलात महिलांसाठी झुंबा व एरोबिक्सवर थिरकल्या महिला

शिवाजी क्रीडा संकुलात महिलांसाठी झुंबा व एरोबिक्सवर थिरकल्या महिला

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512046📱

लाखणी/भंडारा: जिल्ह्यात आज महिला शक्तीच्या जागराचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा द्वारे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा अविनाश पुंड यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आहे.
आरोग्यविषयक जागरूकतेसाठी सकाळी 7.00 ते 9.00 वा रिदम फिटनेसचे संचालक पूजा बारिया टीम द्वारे एरोबिक्स झुंबा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय भंडाराद्वारे विविध क्षेत्रातील गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा श्रीमती सुकेशनी तेलगोटे, संध्याताई गिरोलकर सचिव ग्रीन माईंड संस्था, श्रीमती चव्हाण ताई, वंदना साकुरे शिवछत्रपती अवॉर्ड, लक्ष्मी पंधराम, स्वाती नंदागवली, शिवछत्रपती अवॉर्ड, दीपाली शहारे शिवछत्रपती अवॉर्ड, कल्याणी बेंदेवार शिवछत्रपती अवॉर्ड, प्रिया गोमासे शिवछत्रपती अवॉर्ड, वैष्णवी तुमसरे आंतरराष्ट्रीय खेळाडू, सृष्टी कळंबे, तलवारबाजी प्रशिक्षक, शिवछत्रपती अवॉर्ड या गुणवंत महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी मनोज पंधराम व आभार प्रदर्शन क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांनी केले. कार्यक्रम पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडध्ये व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here