मौजा खुटसावरी येथे जागतिक महिला दिवस सोहळा साजरा  ८ मार्च २०२२ रोजी महिला संगठित, महिला समिक्षकरण भूमिका साकार होईल असे आवाहन 

मौजा खुटसावरी येथे जागतिक महिला दिवस सोहळा साजरा 

८ मार्च २०२२ रोजी महिला संगठित, महिला समिक्षकरण भूमिका साकार होईल असे आवाहन 

मौजा खुटसावरी येथे जागतिक महिला दिवस सोहळा साजरा  ८ मार्च २०२२ रोजी महिला संगठित, महिला समिक्षकरण भूमिका साकार होईल असे आवाहन 

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८३२६८५५ 📱
📞 ८७९९८४०८३८ 📞

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणारे खुटसावरी गावात आज दिनांक ८ मार्च २०२२ रोज मंगळवारला दुपारी १२:३० वाजता महिला जागतिक दिन सोहळा पार पडला
या कार्यक्रमात प्रामुख्यानं उपस्थित राहणारे आयोजक मंडळ खुटसावरी येथील संपुर्ण स्वयम् सहायता समूह कॅडर्स सौ. प्रभावती दमाहे, सौ.प्रीती सिहोरे, सौ.अलका दमाहे, सौ.मीना धांडे, सौ.मधुबाला भोयर, सौ.मुन्नी लिल्हारे, सौ.कल्याणी बिरनवारे, यांच्या उपस्थितीत पाचगाव जिल्हा परिषद क्षेत्राचे नवनिर्वाचित सदस्य मा.श्री. आनंदभाऊ मलेवार ( उद्घाटक ) मा.श्री. बानाभाऊ सव्वालाखे खमारी बूज. प. स.सदस्य, मा.श्री.देवदासजी लिल्हारे, ( माझी सरपंच ) मा.श्री.अनिल बिरनवारे ( ग्राम पंचायत उपसरपंच ) सौ. त्रिशुलाबाई दमाहे अध्यक्ष (ग्राम पंचायत सरपंच ) मा.श्री. भोंदुसिंग बशिने ( ग्राम पंचायत सदस्य ) मा.श्री.विजय पशिने ( माझी सैनिक ) मा.श्री. घनश्याम वैद्य ( शाळा व्य.समिती उपाध्यक्ष ) मा.श्री.संतोष लिल्हारे ( ह. दे. प.कमिटी अध्यक्ष ) मा.श्री. उमेश ना.दमाहे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री.विजय ब.दमाहे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री.लक्ष्मण सीहोरे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री.नरेशभाऊ बिरणवारे ( सामाजिक कार्यकर्ते ) मा.श्री.शुभम दमाहे ( रॉ. काँग्रेस पक्ष युवा ग्राम अध्यक्ष ) मा.श्री.जगदीश बिरनवारे ( सामाजिक कार्यकर्ते ) सौ.रविना ताई लिल्हारे, सौ. रत्नमाला लिल्हारे, सौ. कॉ. मिनाक्षी ताई मेहर ( A.I.S.F. मोहाडी तालुका सचिव ) मा.श्री. कॉम. वैभव चोपकर ( A.I.S.F. all india student federation उपाध्यक्ष भंडारा जिल्हा ) यांच्या उपस्थितीत पार पडले.
” महिला जागतिक दिन ” या प्रसंगी उपस्थित राहणारे आयोजक मंडळ, आलेल्या पाहुण्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ८ मार्च १९०८ मध्ये न्यूयॉर्क मध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करीत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतहासातील पहिला संघर्ष मानला जातो. त्यानंतर १९१० साली सर्व महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती क्लारा झेटगी यांनी सुचविल्या प्रमाणे ८ मार्च या दिवसाला जागतिक महिला दिवस म्हणून मान्यता मिळाली.
* महिला सक्षमीकरण : कायद्याची भूमिका *
” महिला सक्षमीकरण हा विषय आपल्या देशाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. भारताला सक्षम व महासत्ता बनवण्याच्या प्रयत्नांच्या दृष्टीने ” महिलांचे सक्षमीकरण आवश्यक आहे. ”
प्रत्येक महिला आपल्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी आणि स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठऊ शकते, लढू शकते.
महिला मानसिकदृष्ट्या सक्षम झाली तर ती कुठल्याही क्षेत्रामध्ये यश प्राप्त करु शकते. महिलांचे सक्षमीकरनात मानसिक शारीरिक,सुदृढते बरोबरच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविले पाहिजे. प्रत्येक महिला हि आर्थिक, सामाजिक,आणि मानसिक दृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र असली पाहिजे.
एक स्वतंत्र राष्ट्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असतेच. महिलांवरील अन्याय रोखण्यात ” कायद्यांची भूमिका ” खूप महत्वाची असते. त्या पद्धतीचे कायदे संसदेत पारित करण्यात आले आहेत. हुंडा प्रतिबंध कायदा, गर्भधारणा कायदा, सती आयोग, स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा, बालविवाह अधिनियम, लेंगिक छळ अधिनियम यांसारखे कायदे भारतात लागू झालेले आहेत.
” महिला सक्षमीकरण ” हा मुद्दा प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारच्या मोहिमेत असतो. सरकार त्यादृष्टीने महिलांना उपलब्ध होतील तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते. कायद्याची अंमलबजावणी कठोर केली, थोडे सहकार्य पुरुषांनी केले.आणि महिलांना योग्य सुरक्षित वातावरणात कर्तुत्व सिद्धीस कार्यरत केले. तर महिलांनाही योग्य तो सन्मान आणि शक्ती प्राप्त करता येईल.
” स्त्री म्हणजे जन्मदाती,
स्त्री म्हणजे संस्कृती,
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा,
स्त्री म्हणजे घराच घरपण,
स्त्री म्हणजे महान कार्य,
अशा या स्त्री जातीला मानाचा मुजरा, त्रिवार वंदन,
” तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळु दे,
तुझा संसार !
कर्तुत्व अन् सामर्थ्याची ओढून घे,
नवी झालर !
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !! नारी शक्ती की जय, जय जिजाऊ, असा जयकार लाऊन, महिला जागतिक दिवस साजरा करण्यात आला. व लगेच महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रम संपविण्याची घोषणा करण्यात आली, आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार मानून कार्यक्रम संपविण्यात आले.