घोणसे येथे विविध रोग शिबिराचे आयोजन

घोणसे येथे विविध रोग शिबिराचे आयोजन

घोणसे येथे विविध रोग शिबिराचे
आयोजन

घोणसे येथे विविध रोग शिबिराचे आयोजन
✍️संतोष उध्दरकर✍️.
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:श्री रविप्रभा मित्र संस्था व गृप ग्रामपंचायत घोणसे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० मार्च २०२३ वार रविवार रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत विविध रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या आरोग्य शिबिरात क्षयरोग, दमा, अस्थमा, ह्रदय विकार, मधुमेह, रक्तदाब, तसेच नेत्र तपासणी या व्यतिरिक्त शुन्य ते पाच वर्षे वयाच्या लहान मुलांची देखील आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तरी गृप ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामस्थ यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे सरपंच रमेश कानसे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
————————————-
श्री रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत, या वेळी आम्ही घोणसे गृप ग्रामपंचायत येथे संयुक्त पणे विविध रोग निदान शिबीर घेण्यात येत आहे. तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार असून ग्रामस्थांनी या शिबिराचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा.
रवींद्र लाड.
अध्यक्ष
श्री रविप्रभा मित्र संस्था, रायगड.