दहिवली-कर्जत विभागातील मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार थोरवे यांच्या हस्ते…

दहिवली-कर्जत विभागातील मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार थोरवे यांच्या हस्ते...

दहिवली-कर्जत विभागातील मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार थोरवे यांच्या हस्ते…

दहिवली-कर्जत विभागातील मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार थोरवे यांच्या हस्ते...

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३

कर्जत ; दि. ०६ मार्च २०२४ रोजी दहिवली-कर्जत विभागातील मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडला.

मुरबाड कर्जत चौक लोहोप रस्ता रा.मा. ८९ कि.मी. १२२/४५० येथे श्रीराम पुलाच्या दोन्ही बाजूस जंक्शन सुधारणा करणे , रा.महामार्ग -७६ ते उक्रूल, चांदई, कडाव, तांबस, वदप, दहिवली, कर्जत, खांडपे प्रजिमा-१७ सा.क्र. १४/५०० ते २५/५०० (भागाभागात) मध्ये रस्त्याची सुधारणा करणे या विकासकामांचा समावेश आहे. दहिवली गावातील मुख्य रास्ता जो केल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दहिवली विचार मंचाने आमदार साहेबांकडे या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता.आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या शुभहस्ते या रस्त्याचे लोकार्पण होत असल्याने संपूर्ण दहिवली ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.