माणगाव मधील नानोरे येथे बांधकामगारांना घरेलु साहित्य आणि सेफ्टी किट वाटप
✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞७२०८७०८४५६ 📞
माणगाव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई बांधकाम सुविधा केंद्र माणगाव यांच्या वतीने माणगाव मधील नानोरे येथे 7/3/2025 रोजी बांधकामगारांना घरेलु साहित्य आणि सेफ्टी किट वाटप करण्यात आले या कार्यक्रमात साठी सहकार्य निलेश राठोड (बांधकाम सुविधा केंद्र माणगाव इन्चार्ज) तसेच अमृता वाघमारे इनोटेक पुणे व सामाजिक न्याय केंद्र अहमदाबाद संचलित हक्क अधिकार हमी सुविधा केंद्र (EFC) महाड यांचे सहकार्य संयुक्त विद्यमाने माणगाव तालुक्यातील बांधकाम कामगाराच्या साहित्य वाटप करण्यात आले होते या मेळाव्यात तालुक्यातील एकूण 204 बांधकाम कामगारांना गृह उपयोगी साहित्य (भांडी) सेफ्टी कीट वाटप करण्यात आले तसेच कामगाराची कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सुरक्षा किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन महाराणा प्रताप नगर येथील रहिवासी ग्रामस्थ यांनी केले तसेच मनाली पड्याळ, प्रणाली शेंडे, प्रियांका गांधी, स्नेहा सकपाळ, निकिता दळवी, सागर सतवे यांनी महत्वची भूमिका बजावली सदर कार्यक्रमाचा 204 लाभतिनी लाभ घेतला.