पूरसदृश्य वस्त्यांमध्ये आवश्यक कामांच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

पूरसदृश्य वस्त्यांमध्ये आवश्यक कामांच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर शहरातील भांडेवाडी येथील पूरसदृश्य वस्त्यांमध्ये आवश्यक कामांच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी (ता.८) पाहणी केली. यावेळी पूर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे, मनपा अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, नेहरू नगर झोनचे सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, कार्यकारी अभियंता श्री. नरेश शिंगनजुडे, माजी उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, माजी नगरसेविका श्रीमती समिता चकोले आणि भांडेवाडी येथील स्थानिक जनतेची आदी उपस्थित होते.