इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात महिला दिन साजरा
साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घूस: – ८ मार्च २०२४, शनिवार
ताज बहुउद्देशिय संस्था, वणी द्वारे संचालित इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, घुग्घूस येथे शहरातील विविध क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करणाऱ्या प्रेरणादायक स्त्रीयांचा सत्कार करून जागतीक महिला दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाचा संचालिका प्रा. शहनाज पठान मॅडम उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्त्या म्हणून शहरातील प्रसिद्ध डॉ. राणी बोबडे, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार देणाऱ्या शारदा झाडे तसेच समजसेवीका म्हणून काम करणाऱ्या रिता देशकर यांची उपस्थिती होती. या सर्वांनी आपल्या व्याख्यानातुन स्वअनुभव कथन करून विद्यार्थिनिना स्त्रीयांच्यामधीत शक्तीची जाणीव करून दिली. या प्रसंगी महाविद्यालयाच्या बी.ए. व बी.कॉम च्या विद्यार्थीनिंनी महिला दिनावर भाषणे व गीते सादर केलीत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेघना वाघधरे हिने केले तर उपस्थितांचे आभार फरिन खान हिने मानले.