पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तरुणी बरोबर करत होते अघोरी कृत्य; दोन आरोपी पोलिसांचा जाळात, तांत्रिक फरार.
पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तरुणी बरोबर करत होते अघोरी कृत्य; दोन आरोपी पोलिसांचा जाळात, तांत्रिक फरार.

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी तरुणी बरोबर करत होते अघोरी कृत्य; दोन आरोपी पोलिसांचा जाळात, तांत्रिक फरार.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
वर्धा,दि.8.एप्रिल:- वर्धा येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्यामूळे अंधश्रद्धा समाजात किती खोलवर पसरली आहे त्यांची प्रचिती पुन्हा वर्धा जिल्हात समोर आली आहे.

एक तरुणी शिक्षण घेण्यासाठी वर्धेत राहत होती. या तरुणीला सोबत घेत तिची स्वताःची आई, काका आणि अन्याय एक आरोपी पैशाचा पाऊस पाडण्यात येईल अस सांगून हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथे त्या तरुणीला घेउन येत होते. ता सर्व अघोरी प्रकाराला ही तरुणी कंटाळली होती, एक दिवस ही तरुणी कोणाला न सांगता घरुन पळाली होती.

वर्धा जिल्ह्यात पैशांचा पाऊस पडत असल्याच्या नावाखाली युवतीचा छळ केला गेला. अघोरी पूजा करून  तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा भोंदू तांत्रिकाने केला होता. त्यासाठी युवतीला निर्वस्त्र करत तिच्यासोबच घृणास्पद प्रकार करण्यात आला. सातत्याने हा सर्व अघोरी प्रकार आपल्या बरोबर सुरु असल्यामुळे ही तरुणी घर सोडुन पळाली होती. पोलिसांनी या मुलीचा शोध घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये पीडितेच्या आईची भूमिकाही संतापजनक आहे.

या प्रकरणी तरुणीनी दिलेल्या माहिती वरुन वर्धा जिल्हातील रामनगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या काकासह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. यावरून पोलिसांनी अंधश्रद्धा प्रातिबंधात्मक कायद्याअंतर्गत आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या काकासह प्रवीण नामक व्यक्तीला अटक केली. यातील मुख्य आरोपी असलेल्या भोंदू तांत्रिकाचा शोधात पोलिस पथक रवाना झाल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. पैशाच्या कामाकरिता तांत्रिक आणि इतर दोघांनी या मुलीला अनेक ठिकाणी नेल्याची माहिती तिने पोलिस प्रशासनाला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here