श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा संस्थेमध्ये बेकायदेशीर रित्या 50 कोटीचा आर्थिक गैरव्हवहार झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी.
श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा संस्थेमध्ये बेकायदेशीर रित्या 50 कोटीचा आर्थिक गैरव्हवहार झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी.

श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा संस्थेमध्ये बेकायदेशीर रित्या 50 कोटीचा आर्थिक गैरव्हवहार झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी.

सन २०१० ते २०२० पर्यंत पगारामधून कपात केलेला विकास निधी (Socity Development Fund ) परत मिळवू देणेबाबत

सन २०१५ ते २०२० पर्यंतची थकबाकी परत मिळवून देणेबाबत

संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्याबाबत

विजय अटकारी यांच्या वर प्राचार्यानी खोटे आरोप लावून, मानसिक त्रास दिला त्यामुळे त्याला ब्रेन हॅमरेंज आला व तोगेल्या ८दिवसापासून कोमामध्ये आहे.

श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा संस्थेमध्ये बेकायदेशीर रित्या 50 कोटीचा आर्थिक गैरव्हवहार झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी.
श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा संस्थेमध्ये बेकायदेशीर रित्या 50 कोटीचा आर्थिक गैरव्हवहार झाला याची सखोल चौकशी करण्यात यावी.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर (भद्रावती) :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुशंघाने, आम्ही गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ रायगड अंतर्गत येणाऱ्या विनाअनुदानित श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा, त. भद्रावती जी. चंद्रपूर येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आहोत. आमच्या पगारा संदर्भात वरील मुद्दे असून आपणास कळवू इच्छितो .

मागील १० ते ११ वर्षांपासून आमच्या महाविद्यालयामध्ये नियमानुसार वेतन देत नसून कर्मचाऱ्याला अत्यल्प वेतन दिले जात आहे . कर्मचाऱ्याच्या वेतनामधून बळजबरीने/ बेकायदेशीररीत्या विकास निधी कपात करण्यात आलेला आहे. विकास निधी कपात करताना सांगण्यात आले होते की संस्थेचा विकास झाल्यानंतर कपात केलेला विकास निधी तुम्हाला व्याजासहित १० वर्षानंतर परत करण्यात येईल. परंतु आज संस्थेला १२ वर्ष पूर्ण झालेले असूनसुद्धा आम्हाला आमचा कपात करण्यात आलेली विकास निधी ची रक्कम परत मिळाली नाही . आम्ही वारंवार व्यवस्थापनाला कपात करण्यात आलेली विकास निधी ची रक्कम परत करावे अशी विनंती करूनसुद्धा अजूनपर्यंत आमची रक्कम परत मिळालेले नाही.

अशाप्रकारे मागील १० वर्षांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याचे २० ते ४० लाख प्रत्येकी व्यवस्थापनाकडे थकबाकी आहे . वारंवार व्यवस्थापनाला निवेदन देऊन सुद्धा विकास निधी कपात बंद करण्यात आलेली नाही. ऑगस्ट २०१५ पासून आम्हाला सहाव्या वेतन आयोगानुसार १०७ % DA व १० % HRA देण्यात येत होते, त्यामधून आमचा ५०% पर्यंत पगार विकास निधी म्हणून कपात केलेला आहे . तदनंतर २०१५ ते २०२० पर्यंत आम्हाला हाच पगार देण्यात आलेला आहे . २०१५ नंतर आमच्या वेतनामध्ये कोणतीही वाढ केलेली नसून ती वेतनवाढ नियमित करून २०१५ ते २०२० ची थकबाकी आम्हाला मिळवून देण्यात यावी.

व्यवस्थापनाने १८/०३/२०२१ ला पत्र काडून त्यामध्ये नमूद केले आहे की ” आपल्याला Pay Fixation बद्दल वेळोवेळी सभा घेऊन समजून देण्यात आलेले आहे आणि त्याप्रमाणे ऑगस्ट २०२० चा वाढीव पगार सुद्धा देण्यात आलेला आहे ” परंतु आम्ही यावर आमचा आक्षेप नोंदवित आहोत . आम्हाला ऑगस्ट २०२० पासून जी पगारवाढ दिली आहे त्यामध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार २५% DA व ०५ % HRA देण्यात आलेला आहे . महाराष्ट्र शासनाने व AICTE ने २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केलेला असून आम्हाला आज २०२१ मध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार २५ % DA व ०५ % HRA देण्यात येत आहे हि लाजिरवाणी बाब आहे. यावर आम्ही आमचा आक्षेप नोंदवित आहोत व आपण आम्हाला आमची वेतनवाढ नियमानुसार करून द्यावी अशी विनंती करीत आहोत .

तसेच २०१५ पासून रेगुलर झालेल्या व २०१६-१७ मध्ये UGC मान्यता प्राप्त झालेल्या शिक्षकांना अजूनपर्यंत सहावा वेतन आयोग लागू केलेला नाही, अशा शिक्षकांना फक्त १५ ते २२ हजार रुपये वेतन देत आहे. व्यवस्थापनाला विचारले असता ते आम्हाला नियमानुसार पगार देण्याचा असा कोणताही नियम नाही करीत आम्ही जो पगार देतो तो तुम्हाला मान्य करावा लागेल असे सांगण्यात आलेले आहे. विद्यापीठ अधिनियम कायद्या अंतर्गत नियमानुसार पगार देणे बंधनकारक असल्याने आपणास विनंती आहे कि विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती कडे आमची तक्रार नोंदवून घ्यावी व आपणाकडून समिती पाठवून याबाबत चौकशी करण्यात यावी.

महाविद्यालयाने फी वाढीच्या प्रस्तावामध्ये खोटी माहिती देऊन फी वाढून घेतलेली आहे . महाविद्यालयामध्ये सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये ९५ ते ९८ कर्मचारी असून आपल्याला १३८ कर्मचारी असल्याचे दाखविलेले आहे . तसेच २०१८-१९ मध्ये १४२ कर्मचारी असल्याचे दाखविलेले आहे . हि माहिती खोटी असून यामध्ये शासनाची फसवणूक केलेली आहे याची चौकशी करण्यात यावी.

FRA Mumbai व धर्मादाय आयुक्त चंद्रपूर यांचेकडे प्रत्येक वर्षाला ऑडिट पत्रक (Audit Sheet) प्रस्तुत करण्यात आलेले आहेत. ऑडिट पत्रकामधे प्रत्येक वर्षी पगारावरील खर्च केलेली रक्कम खालील तक्त्यामध्ये दिलेला आहेत. दाखवण्यात आलेली इतकी मोठी रक्कम कोणत्याच वर्षी आमच्या वेतनावर खर्च केलेली नाही. हि रक्कम आमच्या वेतनावर खर्च न करता स्वतःच्या उपयोगाकरिता वापरलेली आहेत. संस्थेनी आपणास खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केलेली आहे याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here