शेतकऱ्यांनी आपला कृषी माल विक्रीची घाई करू नये: सभापती ऍड सुधीर कोठारी.

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.7 एप्रिल:- वर्धा जिल्हात कोरोना वायरसचा मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्हातील जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी संपुर्ण वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे 10 व 11 एप्रिलला हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीने धान्य व कापूस मार्केटयार्डचे व्यवहार दोन दिवस बंद राहील, अशी घोषणा केली आहे. 12 एप्रिल सोमवार रोजी धान्य व कापूस मार्केटयार्ड मधील व्यवहार पूर्ववतरित्या सुरू राहील. असे हिंगणघाट बाजार समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन होईल या भीती पोटी शेतकऱ्यांनी माल विक्रीची घाई करू नये असे आव्हान हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड सुधीर कोठारी यांनी शेतकऱ्यांना केले आहे.