वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीजला भिषण आग; लाखोचे नुकसान.
वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीजला भिषण आग; लाखोचे नुकसान.

वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीजला भिषण आग; लाखोचे नुकसान.

वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीजला भिषण आग; लाखोचे नुकसान.
वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीजला भिषण आग; लाखोचे नुकसान

✒प्रशांत जगताप,प्रतिनिधी✒
हिंगणघाट,दि.7 एप्रिल:- हिंगणघाट तालुक्यातील वणी येथील गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड येथील कापडगीरनीत आज दुपारच्या सुमारास कापड विभागात आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वणी परीसरातील गिमा टेक्समधील या कापडगीरणी मधिल कापड विभागातून कामगारांना आगीचे लोळ निघताना दिसताच कामगारांनी उपलब्ध असलेल्या हायड्रेन व अग्निशामक उपकरणाचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग आटोक्याबाहेर असल्याने व्यवस्थापनाने अग्निशामक दल हिंगणघाट व अग्निशामक दल देवळी यांना माहिती देण्यात आली अगदी काही वेळेत अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
 
कापड गिरणीत लावण्यात आलेल्या ट्यूबलाइट मधून ठिणगी उडाल्याने ही आग लागली असे प्राथमिक अंदाजात कापड गिरणी व्यवस्थापना मार्फत सांगण्यात आले. या आगीत कापड गिरणी मधिल मशिनरी, सुत, कच्चा माल, इलेक्ट्रिक केबल, सायझिंग मशीन पार्ट मोठ्या प्रमाणात जळल्याचे समोर येत आहे. या आगीत गिरणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती व्यवस्थपणाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here