आरोग्य सुविधांसह इतर विकासात्मक कामांना निधी कमी पडणार नाही: पालकमंत्री एकनाथ शिंदे
आरोग्य सुविधांसह इतर विकासात्मक कामांना निधी कमी पडणार नाही: पालकमंत्री एकनाथ शिंदे

आरोग्य सुविधांसह इतर विकासात्मक कामांना निधी कमी पडणार नाही: पालकमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे लोकार्पण.

आरोग्य सुविधांसह इतर विकासात्मक कामांना निधी कमी पडणार नाही: पालकमंत्री एकनाथ शिंदे
आरोग्य सुविधांसह इतर विकासात्मक कामांना निधी कमी पडणार नाही: पालकमंत्री एकनाथ शिंदे

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर / गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (दि.7 एप्रिल):- जिल्हयात सद्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे चांगले कार्य सुरू असून इतर विकास कामेही प्रगथीपथावर आहेत. यावेळी आरोग्य सुविधांसह इतर सर्वच विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकित उपस्थितांना दिले. पालकमंत्री यांनी आज जिल्हयात विविध विषयांचा आढावा बैठकीत घेतला. यामध्ये कोरोना, आरोग्य सुविधा, धान खरेदी व साठवणूक, शेती सलग्न विषय, वीज समस्या व नियोजन मधील कामांची सद्यस्थिती यांचा समावेश होता. या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदर कृष्णा गजबे, आमदार डॉ.देवराव होळी, भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, नगराध्यक्षा योगिता पिपरे व तालुका तसेच जिल्हा स्तरावरून सर्व विभाग प्रमुख ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते.

बैठकीआधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे, त्याचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या इतर सुधारणांची प्रत्यक्ष पाहणी केली. यापुर्वी नुकतेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळा, आयसीयू कक्ष यांचे लोकार्पण करण्यात आले होते. तसेच यापुर्वी तालुकास्तरावर सोनाग्राफी सुरू करण्यात आली आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन स्वरूपात विविध विभागांचा त्यांनी आढावा घेतला व विकास कामांबाबत विभाग प्रमुखांना सूचना केल्या. यावेळी उपस्थित आमदार यांनी आपापल्या क्षेत्रातील विकास कामांचे प्रस्ताव व अडचणी पालकमंत्री यांच्याकडे मांडल्या. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्री यांनी संबंधीत प्रशासनाला दिले.

जिल्हयातील प्रलंबित प्रस्तावांबाबत सचिवांशी साधला संवाद : जिल्हयातील विविध कामांबाबत आढावा घेत असताना आलेल्या अडचणींबाबत पालकमंत्री यांनी राज्यस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत विविध विभागाच्या सचिव तसेच वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने प्रस्ताव मंजूरीचे निर्देश दिले. यामध्ये कोरची तालुक्यातील नवीन वीज जोडणी, मत्स्य शेती, धान साठवणूक गोदामे व दुरुस्ती या कामांचा प्रामुख्याने समावेश होता.

नगरपालिका प्रशासनाचा आढावा घेत असताना 25 कोटी रूपये वितरीत केले होते त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच सद्यस्थितीत चालु कामांचे तपशिल जाणून घेतले. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्हयातील प्रमुख शहरात ऑडोटोरीयम उभारण्यासाठी लागणारा निधी व कामांसाठीचा प्रस्ताव केल्याची माहिती दिली. यातून चांगल्या प्रकारे ऑडोटोरीयम जिल्हयात उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 105 कोटी रूपये लागणार आहेत. सदर प्रस्तावाबाबत पाठपुरावा सुरू असल्यासचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनाबाबत खबरदारी घेण्याचे केले आवाहन: कोरोना बाबत सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेत असताना त्यांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज असून संसर्ग रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. संपुर्ण राज्यात कोरोना रूग्ण वाढत आहेत. गडचिरोली जिल्हयातही वाढ निदर्शनास येत आहे. आता पुन्हा सर्व शासकिय यंत्रणांनी मागील कालावधीत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

मत्स्य शेती, स्ट्रॉबेरी व जांभूळ या प्रकल्पांकडे लक्ष वेधले: जिल्हयात शेतीमध्ये आधुनिक शेती करण्याकडे कल वाढीला लागला आहे असे प्रतिपादन पालकमंत्री यांनी बैठकित केले. त्यांनी स्वत:हून मत्स्य शेतीला चालना देण्याबाबत सूचना केल्या. तसेच सद्या मुलचेरा तालुक्यातील नव्याने लागण केलेल्या 1500 स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले जर जिल्हयात उत्पादन चांगल्या प्रकारे येत आहे तर निश्चितच त्याची लागवड मोठया प्रमाणात होवू शकते. यापुढे ते असे म्हणाले की माझ्या जिल्हयातून यासाठी रोपे व इतर तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी शेतकरी जोडून देता येतील. तसेच जिल्हयात उत्पादन वाढल्यास निश्चितच आपल्याला प्रक्रिया उद्योगही उभारता येईल. जांभूळ व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांना विक्रिसाठी नागपूर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी शेती विभागाच्या आखलेल्या नियोजनाची प्रसंशा त्यांनी यावेळी केली. या बैठकीवेळी कृषी विभागामार्फत केंद्र पुरस्कृत आकांक्षित जिल्हा निधीमधून देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचे वाटप पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्फत करण्यात आले.

ज्वारीच्या कणसाच्या गुच्छाने केले शेतकऱ्यांनी स्वागत

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कणसाने तयार केलेल्या गुच्छाने केले. आकांक्षित जिल्हा निधीतून केंद्रपुरस्कृत असलेल्या योजनेमधून जिल्ह्यात वाटप करण्यात येणाऱ्या 24 ट्रॅक्टर पैकी प्राथनिधिक स्वरूपात दोन ट्रॅक्टरचे लोकार्पण करण्यासाठी पालकमंत्री उपस्थित होते. जिल्ह्यात आकांक्षीत जिल्हा निधीतून मिळालेल्या निधीतून प्रत्येक तालुक्याला दोन याप्रमाणे जिल्ह्यात 24 ट्रॅक्टर साठी लॉटरी पद्धतीने गटांची निवड करण्यात आली. या मधील दोन ट्रॅक्टरच्या गटातील शेतकरी सदस्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आवर्जून पालकमंत्र्यांसाठी ज्वारीच्या कणसा पासून तयार केलेले गुच्छ भेट म्हणून दिले. मागील वर्षी रब्बी हंगामात बाराशे हेक्‍टरवर रब्बी ज्वारी चे प्रात्यक्षिक प्रथमच घेण्यात आले. या वर्षीही उत्पादित बियाणे रब्बी हंगामात वापरून ज्वारीचे क्षेत्र वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पालकमंत्री यांना जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here