मुंबई बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याचा पत्नी आणि मुलीने स्वताःला जाळुन आत्महत्या.
मुंबई बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याचा पत्नी आणि मुलीने स्वताःला जाळुन आत्महत्या.

मुंबई बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याचा पत्नी आणि मुलीने स्वताःला जाळुन आत्महत्या.

मुंबई बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याचा पत्नी आणि मुलीने स्वताःला जाळुन आत्महत्या.
मुंबई बॉलीवूडमधील चित्रपट निर्मात्याचा पत्नी आणि मुलीने स्वताःला जाळुन आत्महत्या.

✒️नीलम खरात, प्रतिनिधी✒️
मुंबई,दि.8 एप्रिल:- मुंबई बॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई येथील एका चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने आपल्या राहत्या घरात स्वताःला पेटवून घेत आत्महत्या केली. त्यामुले पुन्हा एकदा बॉलीवूडमधून शोकाकळा पसरली आहे.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांच्या पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी या दोघी माय लेखीने एकाच वेळी स्वताःला पेटवुन आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष गुप्ता यांचा पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी परीसरातील डीएननगर इथे ही आत्महत्या केली आहे. या दोघींनी आपल्या अपार्टमेंटमध्ये खोली बंद करून स्वतःला पेटवून घेतलं. खोलीला आग दिसली, धूर झाल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला बोलविलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

अस्मिता गुप्ता या 55 वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. आईची ही अवस्था पाहून मुलगी सृष्टीनेसुद्धा आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अस्मिता 70 टक्के भाजल्या होत्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सृष्टीने ऐरोली नॅशनल बर्न सेंटर मध्ये उपचार सुरू असताना शेवटचा श्वास घेतला.

याबाबत बोलताना डीएनपोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी भरत गायकवाड यांनी सांगितलं की, या प्रकरणामध्ये आम्ही दोन वेगवेगळ्या मृत्यूच्या घटना दाखल केल्या आहेत. पुढील तपास अजून सुरू आहे. निर्माता संतोष गुप्ता यांनी याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. संतोष गुप्ता यांना कमी बजेट चित्रपटांसाठी ओळखलं जातं. त्यांनी 2011 मध्ये फरार या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचबरोबर संतोष यांनी रोमी द हिरो, गदर, आज की औरत या चित्रपटांची सुद्धा निर्मिती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here