मानसिक तणावामुळे मौजा डोडमाझरी येथिल तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
भंडारा :- विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मौजा डोडमाझरी ( टेकेपार ) येथे दिनांक ६ एप्रिल २०२२ रोज बुधवारला पहाटे ५:३० वाजता च्या सुमारास नामे – नशिब मुकुंदराव शामकुवर वय २७ वर्षे याने मानशिक तनावात येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक नशिब मुकुंदराव शामकुवर हा दारुच्या आहारामध्ये आदी झालेला होता. तो दारू पिण्याचा शौकीन होता. आणि कोणतेही काम न करता गावात रिकामा फिरत होता. हातात पैसे कवळी नसल्याने तो हताश झाला होता. अशातच त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. या बिघडलेल्या मानशिक स्थितीला रोखण्याची क्षमता त्याच्यात नसल्याने बुधवारी पहाटे जुन्या घराच्या लाकडी मयालीला नायलॉन दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
या घटनेची माहीती डोडमाझरी टेकेपार येथील नागरीकांनी पोलीस स्टेशन कारधा येथे दिली. माहीती मिळताच पोलीस स्टेशन कारधा यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. यात हवालदार अशोक सरोदे, पोलीस नायक लक्ष्मीकांत झलके यांनी घटनास्थळी मौका चौकशी करूण पंचनामा केला. त्यावेळी डोडमाझरी या गावातील पुरुष, महिला, उपस्थित होते.
पुढील तपास कारधा पोलीस स्टेशन चे अधिकारी करीत आहे.