बिरवाडी सह २४ ग्रामपंचायत विरोधात महाड पंचायत समिती येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेचा मोर्चा
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):-दि.८ एप्रिल २०२२ रोजी ठिक ११:०० वाजता प्रहार अपंग क्रांती संस्थेने पंचायत समिती महाड येथे मोर्चाचे आयोजन केले होते. महाड तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये ७९ अपंगांची नमूद यादी असून सन २०१९-२०२० व २०२१-२०२१ या वर्षांचा दिव्यांग ५% निधी अपंगांना वाटप करणे गरजेचे होते किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी अपंग कल्याण निधी यांच्याकडे वर्ग करणे गरजेचे होते परंतु तसे न करता ग्रां.पं.मधील ग्रामसेवक यांनी इतर कामासाठी निधी खर्च करण्यात आला अशा प्रकारची उत्तरे वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या दिव्यांगांना दिली गेली कायद्यानुसार दिव्यांगांना आलेला निधी दुसरीकडे खर्च करता येत नाही यामुळे कुठेतरी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाला असून अशाप्रकारच्या २४ ग्रामपंचायतींकडे निधी शिल्लक असून अद्याप गटविकास अधिकारी महाड यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यासाठी न्याय मागण्यासाठी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती महाड यांच्याकडे आमच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा व बिरवाडी सह इतर ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशाप्रकारची मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली.