आठ तास विजेसाठी २०० च्यावर शेतकरी धडकले वडद महावितरणवर ; पोलीसांनी ठेवला चोख बंदोबस्त
• आशिष चेडगे • साकोली तालुका प्रतिनिधी 8605699863
साकोली : काही दिवसांपासून शेतातील विद्युत पुरवठा दोन तासही मिळत नसून शेती उत्पादनाच्या शेवटच्या टप्प्यात आले व हा विजकपात प्रकार बघता पाण्याअभावी पिकांना धोका होत शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास शासनाच्या चुकीच्या धोरणाने हिरावून घेतला जात असल्याने शेतक-यांना आत्महत्येस प्रवृत्त करू नका असा संतापजनक आक्रोश घेऊन दोनशेच्यावर शेतक-यांनी वडद महावितरण ग्रामिण पुरवठा कार्यालयासमोर धडक देत घोषणाबाजी केली व दिड महिनातरी सतत ८ ते १० तास शेतातील विज अखंडीत करा अन्यथा शेतक-यांच्या जीवाला या त्रासापायी धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदार महावितरण राहील असे ठामपणे बोलून निवेदन सादर केले.
अचानक वडद क्षेत्रात कृषि शेतक-यांच्या शेतातील विज दोन तासच केल्याने पाण्याअभावी पिकांना वाळतीचा धोका निर्माण झाला. लागवडीपुर्वीच पुर्वसुचना दिली गेली असती तर शेतक-यांनी पर्यायी पिकांची व्यवस्था केली असती, व आता पिक उत्पादन शेवटच्या टप्प्यात असून हा अघोषित विजकपातीचा अन्यायावर सुकळी, वडद, खंडाळा व सावरबंध येथील शेतकरी भडकले व आज ०८ ला महावितरण वडद येथे २०० च्या वर शेतक-यांनी धडक देत तात्काळ १० तास विज पुरवठा सुरू करा अन्यथा होणा-या नुकसानीपासून वाईट विचार मनात आणन्यास प्रवृत्त करू नये असे शेतक-यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास महावितरणला जबाबदार ठरविले जाईल याबाबद निवेदन सादर केले. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी साकोली पोलीसांनी वडद येथे चोख बंदोबस्त लावलेला होता. निवेदन देतेवेळी यशवंत शेंडे, देवराम कापगते, राजेश शहारे, दिनानाथ बडवाईक दिपक कळसकर यांसह वडद, सावरबंद, सुकळी, खंडाळा येथील दोनशेच्यावर शेतकरी येथे हजर होते.