नांदेड जिल्ह्यातील ३१ न्यायाधीशांच्या बदल्या

नांदेड जिल्ह्यातील ३१ न्यायाधीशांच्या बदल्या

नांदेड जिल्ह्यातील ३१ न्यायाधीशांच्या बदल्या

बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391
9421808760

मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील १ हजार १३ न्यायाधीशांच्या सार्वत्रिक बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात नांदेड जिल्ह्यातून ३१ न्यायाधीश बदलून दुसरीकडे जाणार आहेत. तर २७ न्यायाधीश नांदेड जिल्ह्यात येणार आहेत. यात ५ जिल्हा न्यायाधीशासह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचा समावेश आहे.

या बदल्यांनूसार नांदेड येथून ५ जिल्हा न्यायाधीश जाणार असून ५ येणार आहेत. ७ दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जाऊन ७ नवीन येणार आहेत. तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी १९ जाणार आणि १५ न्यायदंडाधिकारी येणार आहेत. नांदेड येथून बदलून जाणारे जिल्हा न्यायाधीश आणि त्यांची नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे आहे. कमलकिशोर गौतम-औद्योगिक न्यायालय पुणे, कंधार येथील ए.एस.सलगर-सीटी सिव्हील कोर्ट मुंबई,कुटूंब न्यायालयातील एन.डी.खोसे-गोंदिया, मुखेड येथील एन.पी.त्रिभुवन-सीटी सिव्हील कोर्ट मुंबई, बिलोलीचे डी.आर.देशपांडे-संगमनेर जि.अहमदनगर, नांदेड येथे येणारे जिल्हा न्यायाधीश पुढील प्रमाणे आहेत. श्रीमती एम.ए.आनंद-पनवेल रायगड(कंधार), डी.ई.कोठालीकर-मुंबई(बिलोली), सी.व्ही.मराठे-मुंबई(नांदेड), श्रीमती एस.बी.महाले-मुंबई (कंधार), श्रीमती एस.पी.अग्रवाल-मुंबई(नांदेड कुटूंब न्यायालय) असे आहेत.