सीबीएससी बोर्ड च्या एनसीईआरटी च्या हिंदी पुस्तकातील हा धडा आहे.
✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838
या धड्याचे नाव साप असून यामध्ये एका मुलाला साप चावतो. साप चावल्यानंतर त्याची आजी आजोबा त्याला एका मांत्रिका कडे घेऊन जातात. खरतर त्याला साप चावलेला नसतो त्याला माशी चावली असते हे त्या मुलाला माहिती असते. पण त्याला बोलू देत नाही आणि मांत्रिक असे दाखवतो की मी साप चे विष काढले आणि त्याला वाचवले. इथे धडा संपतो.
याचा शेवट असा हवा होता की या मांत्रिकाचा भांडाफोड केला आणि सत्य बाहेर काढले.
पण धड्यात तसे नाही. अशी अपेक्षा केली आहे की विद्यार्थी भांडाफोड करतील.. शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील की असे मांत्रिक नसतात.. पण तसं न होता तिसरीचे विद्यार्थी असं समजतात की मांत्रिक विष काढू शकतो. समजा एखादा शिक्षकच अंधश्रद्धाळू असेल तर तो हा धडा असा शिकवेल कि मांत्रिकच विष काढतात. त्यामुळे अंधश्रद्धा वाढवणारा हा धडा आहे. हा धडा पाठ्यक्रमात असावा का? असल्यास त्याचा शेवट बदलता येईल का? अपेक्षित लर्निंग आउटकम धड्याच्या शेवटीच गोष्टी मध्ये यायला हवा.. की तो मुलगा आजी-आजोबांना सांगतो की मला साप नाही माशी चावलेली असते आणि हा मांत्रिक खोटारडा आहे.
याबाबत शिक्षण विभागास सोबत चर्चा होणे आवश्यक.
आपले यावर काय मत?