जळगांव येथे आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मेळावा व सत्कार सोहळा

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी 

मो: 9284342632

आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र चे नवनियुक्त जिल्हा, व तालुका पदाधिकारी, महिला आघाडी कर्मचारी संघटना युवक संघटना वाहतुक संघटनाचा मेळावा जळगाव येथे शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी आदिवासी जात पडताळणी समितच्या (Tribal Caste Verification Committee) रद्दा करा अशी मागणी माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी यावेळी मागणी केली.

पत्रकार संघाच्या कार्यालयात नवनियुक्त पदाधिकारींचा नियुक्ती पत्र व सत्कार समारंभ आदिवासी नेते माजी कैबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे यांच्या प्रमुख उपस्थित झाला. अध्यक्षस्थानी प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे, राज्य संघटक प्रशांत तराळे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भाऊराव बागुल, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब फुणगे, माजी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, बाळासाहेब सैंदाणे, जिल्हापूर्व विभाग जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष रविंद्र नन्नवरे, नगरसेवक किशोर बाविस्कर, उपाध्यक्ष शंभू शेवरे मार्गदर्शक गंभीर उन्हाळे, महासचिव मनोहर कोळी, आदिवासी एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश बाविस्कर, प्रा संजय मोरे, रोहन सोनवणे प्रसिद्धी प्रमुख शैलेन्द्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी कार्यध्यक्ष प्रशांत सोनवणे, संदीप सोनवणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनिता तायडे महानगर जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भांडे मेळाव्यात बोलतांना म्हणाले, की जात पडताळणी समित्यामधील अधिकारी जात प्रमाणत्र देण्यास नाहक अटी लागू करत आहे. त्यामुळे कोळी बांधवांना जातप्रणात्र मिळत नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही. कोळी समाज हा आदिवासी जमाती आहे तो संविधानीक अधिकार आहे मात्र जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने कोळी समाजात रोष निर्माण होत असल्याने या समित्या शासनाने रद्द कराव्या अशी मागणी यावेळी केली.

याप्रसंगी जिल्हातील नवनियुक्त पदाधिकारींना नियुक्ति पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन आदिवासी कोळी महासंघ चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे तर आभार शंभू शेवरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here