बनवा आपले गाव एक आदर्श गाव…

 

प्रफुल मदनकर

कृषी उद्योजक

‘आदर्श गाव ‘ ही संकल्पना आपण सर्वांनी एकली असलाच,आपले गाव आदर्श कसे होईल यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात आ.श्री.पोपटराव पवार,श्री.भास्करराव पेरे पाटील,थोर समाजसेवक आ.अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला व त्यांनी त्यांच्या कार्यातून ते सिध्द करून दाखविले.

देशात जवळपास ६.५ लाख गावे आहेत,५५०० तालुके,३६ राज्ये परंतु अजूनही यापैकी मोचकीच गावे आदर्श करण्यात यश आले आहे.गावाला जर आदर्श करायचे असेल तर गावातील ग्रामपंचायत ‘ सरपंच ‘ यांनी पुढाकार घ्यायला हवा.

गावातील प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन,पाण्याची व्यवस्था करणे,आरोग्य,शिक्षण,रोजगार,उद्योग यातून ग्राम स्वांवलबन करणे.गावामध्ये राजकारण न करता गावाच्या विकासात भागीदार होणे हेच मानवाची खरी सेवा आहे हे गावातील सर्वांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले पाहिजे तरच गाव स्वच्छ व निरोगी राहतील.आणि गावाचा विकास होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here