यावर्षी साजरे होतेय भरड धान्य वर्ष: भरड धान्य म्हणजे काय?

प्रफुल मदनकर

कृषी उद्योजक

भारत सरकारनी यंदा २०२३ हे वर्ष कृषी या क्षेत्रासाठी भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.भरड धान्यात ‘ ज्वारी, बाजरा,राजगिरा,कोद्रो,नाचणी,भगर,कुटकी, राळा,सावा इत्यादी पिकांचा समावेश होतो.एवढेच नाही या धान्यात कर्बोदके असल्यामुळे तर मानवाच्या आरोग्यासाठी पोषक असून कमी पाण्यात याची लागवड केली जात.

हे पिक कमी पाण्याच्या क्षेत्रात येत असल्यामुळे उष्ण व कोरडवाहू जमिनीत या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.म्हणून या धान्याला विशेष महत्व आहे.शेतकऱ्यांनी कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात याचे उत्पादन घ्यायला हवेत.ज्यात त्यांना चांगला नफा यातून मिळेल व कुटुंबाची अन्न धान्याची गरज सुध्दा भागवू शकेल.यासाठी शेतकऱ्यांनी यासाठी या पिकांचा अभ्यास करून याचे आपल्या भागात क्षेत्र वाढवायला हवेत त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here