अदानी घोटाळ्याची चौकशी करण्यास पंतप्रधान तयार नाहीत, तर मग पंतप्रधानांनी त्यांचे अदानिशी असलेले नाते सबंध जाहीर करावे – डॉ. नामदेव किरसान.

अमित सुरेश वैद्य

 मो:7499237296

दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी मौजा नगरी ता. जि. गडचिरोली येथे हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ नगरी यांच्या सौजन्याने प्रस्तुत “आक्रोश मायेचा” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधून भाजप शिंदे सरकार समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली द्वारे गडचिरोली ते नागपूर 175 किलोमीटर पायी चालत जाऊन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना समस्यांशी अवगत केल्यावर त्यांनी गडचिरोलीला येऊन लक्ष घालतो व समस्यांचे निराकरण करतो असे आश्वासन देऊन सुद्धा ते गडचिरोलीकडे अजूनही फिरकले नाहीत त्यामुळे राज्यातील भाजप शिंदे सरकार जनतेच्या समस्यांबाबत किती उदासीन आहे हे दिसून येते. तसेच केंद्रातील मोदी सरकार अदानीच्या घोटाळ्याची चौकशी करायला तयार नाही. पुंजीपती गौतम अदानी यांचा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यावर ही याविषयी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी होण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत असताना सुद्धा सरकार चौकशी करायला तयार नाही. उलट या विषयी संसदेत प्रश्न विचारणाऱ्या राहुलजी गांधी यांची द्वेष भावनेतून खासदारकी रद्द केली जाते व ताबडतोब शासकीय निवास रिकामे करण्यास सांगितले जाते अशा प्रकारची दडपशाही जर या लोकशाहीत होत असेल तर येणाऱ्या काळात मतदारांनी अशा लोकांना धडा शिकविला पाहिजे असे आवाहन डॉ. किरसान यांनी यावेळी केले.

यावेळी मंचकावर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, श्री डी एन चापले, डॉ. नरोटे, एडवोकेट संजयराव ठाकरे, डॉ. बुटे, प्रा. शेषराव येलेकर, दादाराव चुधरी, पी.पी. मस्के सर, करोडकर सर, सरपंच नागेश्वरी तिवाडे, अ जा विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रदीप पाटील महाजन व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here