मायगाव देवी रेणुका माता यात्रा उत्सव साजरा

111

मायगाव देवी येथे रेणुका माता यात्रा उत्सव साजरा

सुनील भालेराव 

कोपरगाव प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये मायगाव देवी येथे पारंपारिक पद्धतीने रेणुका माता यात्रा उत्सव साजरा. अनेक गाव गावच्या भाविक भक्तांनी हजेरी लावली विविध प्रकारची दुकाने तसेच लहान मुलांची खेळणी विविध प्रकारचे सेल लागले होते.

विविध प्रकारच्या पाळण्याने यात्रेची शोभा वाढली होती पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या रेणुका माता मंदिराच्या वरती व आजू बाजूला रंगबिरंगी लाइटिंग माळांचे डेकोरेशन केले होते रेणुका माता मूर्ती अतिशय सुंदर आहे अनेक भाविक भक्तांनी आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रार्थना केली.

यात्रेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीच्या कुस्त्यांचा जंगी सामना झाला रेणुका माता उत्सव आठ दिवस चालतो बऱ्याच गावचे लोक दर्शनासाठी पाई पाई येतात.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव शांततेत पार पडला .