रायगड कबड्‌डी स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन

रायगड कबड्‌डी स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन

एम डी वॉरियर्सची विजयी समाली
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिरएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रायगड कबड्‌डी लीग स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटन समारंभास कबड्‌डीक्षेत्रातील मान्यवर, अर्जुन पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते ,राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू,, सर्व आठ संघांचे मालक उपस्थित होते.

अलिबाग समुद्र‌किनात्यावरील मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभात कुणाचेही भाषण झाले नाही. स्पर्धेत सहभागी असावेल्या आठ संघातील खेळाडूचे उत्कृष्ट संचालंन झाले.आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडित पाटील, अँड. गौतम पाटील, हर्षल पाटील, वैकुंठ पाटील, अँड .महेश मोहिते, अँड .अंकित बंगेरा, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे,छत्रपती पुरस्कार विजेत्या छाया देसाई – पवार , रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मुख्यकार्यवाह चित्रा पाटील, रायगड कबड्डी लीगचे अध्यक्ष अँड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष संजय पाटील, सहकार्यवाह जे.जे. पाटील, संजय ओकल, दिलीप धुमाळ, हिराचंद पाटील, शरद कदम, प्रमोद मात्रे, सूर्यकांत ठाकूर, जगदीश पाटील, लक्ष्मण गावंड, यतीन घरत , नरेश म्हात्रे, ओंकार पिंगळे, सुमित माने, संदेश बेकर, रणजीत राणे , प्रफुल्ल पाटील, पांडुरंग पाटील, जनार्दन पाटील , रवींद्र म्हात्रेआदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संघाची विजयी सलामी

रायगड कबड्‌डी लीग स्पर्धेतील पहिला साखळी सामना ए बी सुपर प्लेअर व एम डी वॉरियर्स या दोन संघात झाला. हा सामना जिंकून एम डी वॉरियर्स संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली. एम डी वॉरियर्स संघाने ए बी सुपर प्लेअर्स संघाचा३२ – २२ असा पराभव केला. चार दिवस खेळल्या जाणान्या या स्पर्धेत एकूण ३२ सामने खेळले जाणार आहेत.