सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाहीँ येथे सॉफ्ट स्किल कार्यशाळेचे आयोजन
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि करिअरच्या संधी वाढवण्यासाठी सॉफ्ट स्किल कार्यशाला आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत एमकेसीएल आय लाइक चे, जिल्हा समन्वयक गुलशन गोटेफोड़े उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना अड-ऑन कोर्सेस बद्दल सविस्तर माहिती दिली. हे कोर्सेस नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात, यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांना या कोर्सेसचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि व्यावहारिक महत्त्व समजावून सांगितले.
डॉ. राजेश डहारे यांनी आपले मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात अशा प्रकारचे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशील कुंजलवार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अड-ऑन कोर्सेस शैक्षणिक क्रेडिट मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत असे सांगितले. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा यासाठी प्रेरित केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. रिझवान शेख, प्रा. सायली पालकर आणि प्रा. साहेबराव आडे यांचीही उपस्थिती या कार्यशाळेत होती
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रर्दशन प्रा. अमित उके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशश्वीते साठि सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनि परिश्रम घेतले