प्राण्यांमध्ये वाढत आहे कोरोना, लायन सफारी पार्कमधिल दोन सिंह कोरोना बाधित.

इटावा,दि08 मे(प्रतिनिधी):- उत्तर प्रदेशातील इटवा येथील लायन सफ़ारी पार्क मधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पार्क मध्ये असल्याला प्राण्यांना कोरोना झाला असल्याच्या रिपोर्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. सिहाची अवस्था गंभीर आहे, त्यांनी अन्न पाणी सोडले आहे. त्यांना पार्क मधिल कर्मचार्याकडून कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे बोलले जात आहे. पाच सफारी कर्मचार्याना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
संपुर्ण भारतात कोरोना वायरसने हाहाकार माजवला आहे. हर रोज लाखोच्या वर कोरोना वायरस बाधित समोर येत आहे. तर हजारो लोक रोज मृत्युचा कवेत जात आहे. माणूस लॉकडाऊनमध्ये घरामध्ये बंद असताना प्राणीजगत मात्र मुक्त विहार करताना पाहायला मिळत होतं. मात्र आता कोविडचं सावट प्राण्यांपर्यंत देखील जाऊन पोहोचलं आहे.
दिवसाने दिवस उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचं संकट वाढतं आहे. याठिकाणी इटावामध्ये असणाऱ्या लायन सफारी पार्कातील दोन सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. सिंहाना कोरोनाची लागण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.