भिवंडी महानगर पालिकेचा आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक निलंबित.

60

भिवंडी महानगर पालिकेचा आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक निलंबित.

भिवंडी महानगर पालिकेचा आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक निलंबित.
भिवंडी महानगर पालिकेचा आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक निलंबित.

✒अभिजीत सकपाळ, भिवंडी प्रतिनिधी✒
भिवंडी,दि8मे:- आज मुंबई आणि मुंबई उपनगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना वायरस वाढत आहे. रोज हजारो कोरोना वायरस बाधित समोर येत आहे. तर शेकडो कोरोना वायरस बाधित रुग्णांचा मृत्यु होत आहे. त्यात काही अधिकारी हलगर्जी पणा करुन एकप्रकारे कोरोना वायरसला वाढण्यास मदत करत असल्याचे पण समोर येत आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महानगरपालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता व जंतुनाशक औषध फवारणी करणे आवश्यक असताना आरोग्य विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, आरोग्य निरीक्षक या कामांमध्ये हलगर्जी करीत आहेत. वरिष्ठांना स्वच्छतेसंदर्भात खोटा अहवाल व चुकीची माहिती देत असल्याची बाब काही नागरिकांनी भिवंडी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी चौकशी करुन प्रभाग समिती क्रमांक 4 चे आरोग्य निरीक्षक जयवंत सोनवणे यांना पालिका उपायुक्तांनी बुधवारी तडकाफडकी निलंबित केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्य निरीक्षक सोनवणे यांनी प्रभाग समिती क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम न राबविता तसेच जंतुनाशक औषध फवारणी न करता मनमानी काम करून वरिष्ठांना चुकीची व खोटे अहवाल सादर केले. त्यामुळे यासंदर्भात केलेल्या चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांना निलंबित केल्याची माहिती उपायुक्त दीपक झिगाड यांनी दिली आहे.