माणगांव व म्हसळा तालुक्याच्या सीमेवर तलई च्या पुनवृत्ती चे लक्षण, उभ्या डोंगरातील संपूर्ण झाडांची तोड, दरड कोसळल्याने डोंगर लगत मार्गावरील प्रवासी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण. पावसाळ्यात दरड कोसळून डोंगरालगत वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता

माणगांव व म्हसळा तालुक्याच्या सीमेवर तलई च्या पुनवृत्ती चे लक्षण,

उभ्या डोंगरातील संपूर्ण झाडांची तोड, दरड कोसळल्याने डोंगर लगत मार्गावरील प्रवासी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण.
पावसाळ्यात दरड कोसळून डोंगरालगत वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता

माणगांव व म्हसळा तालुक्याच्या सीमेवर तलई च्या पुनवृत्ती चे लक्षण, उभ्या डोंगरातील संपूर्ण झाडांची तोड, दरड कोसळल्याने डोंगर लगत मार्गावरील प्रवासी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण. पावसाळ्यात दरड कोसळून डोंगरालगत वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगांव व म्हसळा तालुक्याच्या सीमेवर फलानी गाव च्या हद्दीत प्रसिद्ध भीमादेवी पीठ मंदिराच्या काही अंतरावर रस्ता लगत विशाल व उभ्या डोंगरातील मोठ्या प्रमाणात झाडं व झाडी झूडपांची एकत्रित तोड करण्यात आल्यामुळे डोंगरातील मातीची धूप झाली आहे, झाडांची मुळे मातीला गच्च पकडून ठेवतात, त्यामुळे माती झाडांना उपटण्यापासून रोखते. रस्ता लगत असलेल्या उभ्या डोंगरातील मोठ्या प्रमाणात झाडांच्या एकत्रित तोड साठी शासनाकडून परवानगी कशी दिली जातो असे अनेक प्रश्न निसर्ग प्रेमिंकडून निर्माण करण्यात येत आहेत. पावसाळ्यात भुसखलन होऊन दरड कोसळून डोंगर लगत शेतघरे व दुचाकी चारचाकी सवार व इतर वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या तसेच भीमादेवी पीठ मंदिरात दर्शनासाठी येण्या जाणाऱ्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

सद्या उन्हाळा सुरु आहे व उन्हाळ्यात भले मोठे दगड गरगडत डोंगर व रस्ता दरम्यान बांधलेल्या तार कंपाउंड च्या तारांना तोडून वाहतुकीच्या मार्गापर्यंत पोहचले आहेत, तसेच पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याच्या निचरा होण्या साठी रस्ता लगत असलेला गटार गरगडत आलेल्या भल्या मोठ्या दगडामुळे व डोंगरातील केलेल्या झाडांपैकी काही मोठी झाडं गटारात पडलेली असून पावसाळ्याच्या पाण्याच्या निचरा साठी अर्थला निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने झाडांची नवीन लागवड करून देखील सदरील धूप झालेली माती गच्च होणे अशक्य असल्याने जोरदार पावसाळ्यात भुसखलन होऊन दरड कोसळण्याची तसेच डोंगराच्या वरच्या भागात खोदलेल्या तलावापर्यंत व डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बनवल्याने केलेल्या उत्खनना मुळे डोंगरातून निघालेले भले मोठे दगड तसेच डोंगरावर ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात भले मोठे दगड गरगडत खाली येऊन अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता असून मार्गावरून दुचाकी सवार व इतर प्रवासी नागरिकांच्या व प्रवासी भाविकांना जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सदरील निर्माण झालेल्या धोक्याची घंटी शासकीय अधिकारी गांभीर्याने घेणार का ? तसेच वेळेवर उपाय योजना करून सदरील मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने शासन तात्काळ समाधानकारक पाऊल उचलणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून व निसर्ग प्रेमिंकडून निर्माण केले जात आहेत.