वीज कोसळून बैलासह म्हशीच्या मृत्यू.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नांद. नांद परिसरातील गावाच्या शिवारात मंगळवारी दि.(७)दुपारी १:३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाचा अवकाळी पाऊस व गारपिटीला सुरुवात झाली.
त्यातच वीज कोसळल्याने पांढरा पार शिवारात बैल आणि खातखेडा शिवारात म्हशीचे होळपरून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला. अवकाळी पावसामुळे या भागातील उन्हाळी व भाजीपाल्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले.
भिवापूर तालुक्यातील नांद बेसुरपांजरपार खातखेडा शिवारात मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली काही वेळात गारही पडायला लागल्या 15 शिवारातील दिलीप गणपतराव लांबट यांच्या शेतात त्यांच्या मालकीचे चार बैल , दोन गाई व वासरे बांधली होती. जोरात कडकलेल्या वीज थेट त्या गुरांजवळ कोसळल्याने त्याचा एक बैल एक जखमी गाभण जर्सी गाय आणि दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला. या घटनेत आपला किमान एक लाख हा 40 हजार रुपयांचा नुकसान झाले. अशी माहिती दिलीप लांबट यांनी दिली. जखमी बैलावर उपचार सुरू केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले रमेश थेरे , रा. खातखेडा यांना गावा लागत गोठा आहे. त्या गोठ्यात त्यांच्याही मालकीची म्हैस बांधली होती गोठ्यावर वीज कोसळल्याने त्या म्हशीचा होरपडून मृत्यू झाला. वादळामुळे या गावांमधील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. माहिती मिळताच उमरेड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी बेसूर परिसरातील पाहणी केली.
भाजीपाल्यासह पिकांचे नुकसान
या भागातील काही शेतकरी भाजीपाल्यांची शेती करीत असून , काहींनी उन्हाळी मूग व तिळाची लागवड केली आहे . गारपीट व अवकाळी पावसामुळे या दोन्ही भाजीपाल्यांसह या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे उत्पादन घटणार असून, प्रत खालावणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. वादळामुळे गावरान व काहींच्या शेतातील कलमी आंब्याचे नुकसान झाले.