म्हसळा तालुक्यात मतदान शांततेत पार. शहरात ६१ . ५० टक्के तर तालुक्यात ५१ टक्के मतदान जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात बजावला मतदानाचा हक्क . दोन्ही पायांनी अपंग असुन देखील मतदान केंद्रावर येऊन केले मतदान.

म्हसळा तालुक्यात मतदान शांततेत पार. शहरात ६१ . ५० टक्के तर तालुक्यात ५१ टक्के मतदान

जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात बजावला मतदानाचा हक्क .

दोन्ही पायांनी अपंग असुन देखील मतदान केंद्रावर येऊन केले मतदान.

म्हसळा तालुक्यात मतदान शांततेत पार. शहरात ६१ . ५० टक्के तर तालुक्यात ५१ टक्के मतदान जेष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात बजावला मतदानाचा हक्क . दोन्ही पायांनी अपंग असुन देखील मतदान केंद्रावर येऊन केले मतदान.
✍️संतोष उध्दरकर. ✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞

म्हसळा:३२ रायगड लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्यातील मतदान शांततेत पार पडले, यावेळी म्हसळा तालुक्यातील व शहरातील महिला, जेष्ठ नागरिक व तरुण वर्ग सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडताना दिसले, सकाळपासूनच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या, खास करून जेष्ठ नागरिक व महिला मतदान करताना मोठ्या प्रमाणात दिसत होते. नागरिकांकडून मतदान कार्ड, आधार कार्ड, या कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता, जरी उष्णतेची झळ लागत असली तरी सुजाण नागरिकांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावला , मतदान हा आपला अधिकार असल्याची जाण ठेवून दुर्गवाडी येथील गणेश बांद्रे हा तरुण दोन्ही पायांनी अपंग असुन देखील मतदान केंद्रावर येऊन मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजावताना दिसला. तालुक्यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी कमी प्रतिसाद मिळाला कारण ग्रामीण भागातील मुंबईकर यांनी मतदानासाठी पाठ फिरवल्याने तालुक्यात मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हसळा शहरात एकुण ६१ .५०टक्के मतदान झाले, तर तालुक्यात एकुण ५१ टक्के मतदान झाले.म्हसळा नगरपंचायत व तहसील कार्यालय यांच्या कडून प्रत्येक मतदान केंद्रावर योग्य व्यवस्था करण्यात आली होती, नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप बांधण्यात आले होते तसेच पाण्याची व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली होती , अपंग यांच्या साठी व्हीलचेयर ची देखील व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये, मतदान सुरळीत पार पडावे म्हणून पोलीस प्रशासन यांनी देखील योग्य सहकार्य करुन महत्वाची भूमिका बजावताना दिसले. तसेच पोलीस प्रशासन व नगरपंचायत यांच्या सांगण्यावरून सर्व व्यापारी वर्गाने देखील बाजारपेठ बंद ठेवून सहकार्य केले. जरी शहरात मतदान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी तालुक्यातील काही भागात कमी प्रमाणात मतदान झाले आहे.