फेरीवाल्यांवर कारवाई साठी पोलिसांना लागते हायकोर्टाची ऑर्डर.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- गोरेगांव पश्चिम मधे आज पोलीस प्रशासनाकडून फुसकी कारवाई करण्यात आली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पोलिसांकडून असे उत्तर देण्यात आले कि, मुंबई हायकोर्टाकडून आम्हाला ऑर्डर आली आहे म्हणून फेरीवाल्यांवर आम्ही कारवाई करत आहोत.
तसेच संपूर्ण मुंबईत ल्या ठिकाणानवर फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे त्याच अनुषंगाने गोरेगांव प्रेम नगर मधल्या ही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे, विशेष म्हणजे फेरीवाला मोहिमेत मुंबई पालिकेचे कुठलेही अधिकारी पाहायला न मिळाल्याने अच्चर्य व्यक्त करण्यात आले.
तसेच काही फेरीवाले फरार झाले तर काही फेरीवाल्याना पोलिसांनी व्हॅन मधे टाकून पोलीस स्थानकात नेण्यात आले. व नंतर सोडून ही देण्यात आले. अर्ध्या तासांच्या कारवाईनंतर फेरीवाल्यांची जुळवा – जुळव चालूच राहिली, नंतर परत फेरीवाले ठाण मांडून बसले. जणू काही पोलिसांच्या कारवाईला फेरीवाल्यांनी केराची टोपली दाखवली. अशा फुसक्या कारवाया करून पोलिसांनी काय साध्य केलं हे महत्वाचं प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला. एवढीच जर धमक पोलिसांमध्ये असेल तर कायमचे फेरीवाल्यांचा बंदोबस्त करावा, दुटप्पी भूमिका पोलीस प्रशासनाने घेऊ नये व सर्व सामान्य नागरिकांची दिशाभूल करू नये अशी चर्चा आता प्रेम नगर मधील जनता करू लागली आहे.
अमावस्या पौर्णिमेला येऊन प्रेम नगरच्या फेरीवाल्यांवर कारवाई करून आजपर्यंत किती फेरीवाले कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे जनतेला समजलं तर बरं होईल. थातूर मातुर कारवाईला फेरीवाले न जुमानता प्रशासनावरच ताशेरे ओढले जाते.
प्रेम नगरच्या फेरीवाल्यांचा एवढा गंभीर विषय अजून ना पालिका सोडवू शकली ना पोलीस प्रशासन, नक्की पाणी मुरतंय कुठे असा सवाल तिथल्या जनतेला पडलाय. फक्त दिशाभूल करण्याचे काम सध्या दोन्ही प्रशासनाकडून चालू आहे. हे कधी थांबणार का असा नाराजीचा सूर तिथल्या नागरिकांना होऊ लागलंय. हायकोर्टाकडून फेरीवाल्याना हटवायची जर पोलीस प्रशासनाकडे ऑर्डर असेल तर, अशा कारवाया करून पोलीस प्रशासनाकडून हायकोर्टाचा अवमान होत आहे असं वाटत नाही का. आता याबद्दल पोलिसांची पुढील भूमिका काय आहे हे पाहावं लागेल