मुंबई-गोवा हायवेवर अपघाताची मालिका सुरूच

मुंबई-गोवा हायवेवर अपघाताची मालिका सुरूच

पुई पेट्रोल पंपासमोर डंपरची पिकप गाडीला जोरदार धडक,पिकप चालक जखमी

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील महामार्गावर दररोज अपघाताची मालिका सुरूच असुन मुंबई गोवा महामार्गावरील पुई पेट्रोल पंपासमोर बुधवार दि. ७ मे २०२५ रोजी रात्री २०.३० वाजता रवि सुरेश राजगुरू वय वर्षे २६ रा.खंडोबा कॉलनी फनेगाव,कामतघर, भिवंडी,जि. ठाणे हा त्याच्या ताब्यातील पिकप वाहन क्र. एम. एच. ०४ एच वाय ९९६१ही स्वतः मुंबई गोवा हायवे रोडने चालवीत घेऊन जात असतांना पुई गावाच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर मुंबई-गोवा रोडने जात असतांना डंपर क्रमांक एम एच २०ईजी १२११वरील चालक धर्मराज मुन्नीलाल कोल वय ३० रा. केटीएल कंपनी खांब हा त्याच्या ताब्यातील डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे येणारे व जाणारे वाहनाकडे दुर्लक्ष व धोकदायक पद्धतीने विरुद्ध दिशेला येऊन पिकप वाहनावर धडक दिल्याने हा अपघात झाला या अपघातात पिकप चालक याला लहान मोठया स्वरूपाच्या जखमा झाल्या याशिवाय दोन्ही गाडयांचे नुकसान झाले.
अपघातात कारणीभूत ठेलेला डंपर चालक याच्यावर कोलाड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं.४४/२०२५भा. न्या.संहिता २०२३ चे कलम बिएनएस २८१, १२५(ए )मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन याचा अधिक तपास कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि एन. एम. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास अंमलदार पोहवा.कुथे कोलाड पोलिस ठाणे हे करीत आहेत.