ब्रम्हपुरी शहरात वडीला पाठोपाठ कर्त्या मुलीच्या आकस्मित मृत्यूने कुटुंबावर उपासमारीचे संकट.

54

ब्रम्हपुरी शहरात वडीला पाठोपाठ कर्त्या मुलीच्या आकस्मित मृत्यूने कुटुंबावर उपासमारीचे संकट.

अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत घरात दोन मृत्यू. श्रीराम मंदिर समिती(विज्ञानगर)व वार्डातील रहवासी आले मदतीला धावून.

ब्रम्हपुरी शहरात वडीला पाठोपाठ कर्त्या मुलीच्या आकस्मित मृत्यूने कुटुंबावर उपासमारीचे संकट.
ब्रम्हपुरी शहरात वडीला पाठोपाठ कर्त्या मुलीच्या आकस्मित मृत्यूने कुटुंबावर उपासमारीचे संकट.

अमोल माकोडे, ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी✒

ब्रम्हपुरी :- शहरातील कुर्झा वार्डातील विज्ञानगर येथे दोन वर्षा अगोदर मधमाषांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने घरातील कर्ता पुरुष गमावल्याचे दुःख जाते न जाते तोच आकस्मित पणे त्याच व्यक्तीची मुलगी कुमारी रश्मी सुधाकर भानारकर वय 17 हिच्या मृत्यूने परिवारातील प्रकृती अस्वस्थ असलेली आई व लहान भावावर उपासमारी चे संकट आल्याची घटना 6 जून रविवार ला घडली आहे

गरिबीचा शाप आणी त्यातच घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक मृत्यूने दुःखाचा कोसळलेला डोंगर सावरत अल्पवयीन मुलांचा सांभाळ करत घरातील महिलेने केलेले कसोशीचे प्रयत्न वाढती महागाई व कोरोना काळात बंद असलेल्या रोजगारा मुळे अपुरे पडलेत, घरातील परिस्थिती बघता समजदार अल्पवयीन मुलगी रश्मी मिळेल ती मजुरी व मिळालेले घरकाम करून आई ला संसारात हातभार लावत सर्व सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होती मात्र नियतीला वेगळंच काही मंजूर असल्याने अल्पशा आजाराने व कमजोर आर्थिक परिस्थिती मुळे योग्य इलाजा अभावी रश्मी चा रविवारी पहाटे अचानक मृत्यू झाला.

अश्या कठीण समयी श्रीराम मंदिर समिती कुर्झा (विज्ञानगर) व कुर्झा विज्ञानगर वार्डातील सर्व सुसंस्कृत रहिवाशीयांनी आपुलकीने मदतीला धावत सामाजिक बांधिलकी जोपासत भानारकर कुटुंबाला आधार देण्याचा पुरेपूर प्रयत्न वार्डात पाहायला मिळाल्याने माणुसकीचं दर्शन संपूर्ण वार्डात घडले.