खासदार नवनीत राणान बनवल एस.सी जातीच नकली प्रमाणपत्र? जात प्रमाणपत्र झाल रद्द, आता जाणार खासदारकी?

52

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
नागपूर,दि.8 जुन:- युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केल्याने राजकिय वर्तुळातात एकच खळबळ उडाली आहे. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे नवनीत राणाची खासदारकी जाणार अशि चर्चा जोर धरत आहे.

नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे.

नवनीत राणाची पहिली प्रतिक्रिया
मी अजून पर्यंत न्यायालयाने दिलीला निकाल वाचलेला नाही. निकाल वाचल्यानंतर कळेल. न्यायालयाने निर्णय दिला आहे. मी त्याचा आदर करते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत. मी सर्वोच्च न्यायलायत जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

काय आहे हे प्रकरण?
शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी 2014 साली नवनीत राणा यांच्या विरोधात निवडून आले होते. मात्र, 2019 च्या लोकसभेचा सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावेळी नवनीत राणा यांनी जात प्रामाणपत्र देऊ करून निवडणूक लढली होती. मात्र, याविरोधात 2017 साली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. हा संविधानिक घोटाळा असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय.