*
वडीला पाठोपाठ कर्त्या मुलीच्या आकस्मित मृत्यूने कुटुंबावर उपासमारी चे संकट*
अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत घरात दोन मृत्यू.
श्रीराम मंदिर समिती(विज्ञानगर)व वार्डातील रहवासी आले मदतीला धावून
✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी :-
शहरातील कुर्झा वार्डातील विज्ञानगर येथे दोन वर्षा अगोदर मधमाषांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने घरातील कर्ता पुरुष गमावल्याचे दुःख जाते न जाते तोच आकस्मित पणे त्याच व्यक्तीची मुलगी कुमारी रश्मी सुधाकर भानारकर वय 17 हिच्या मृत्यूने परिवारातील प्रकृती अस्वस्थ असलेली आई व लहान भावावर उपासमारी चे संकट आल्याची घटना 6 जून रविवार ला घडली आहे
गरिबीचा शाप आणी त्यातच घरातील कर्त्या पुरुषाच्या अचानक मृत्यूने दुःखाचा कोसळलेला डोंगर सावरत अल्पवयीन मुलांचा सांभाळ करत घरातील महिलेने केलेले कसोशीचे प्रयत्न वाढती महागाई व कोरोना काळात बंद असलेल्या रोजगारा मुळे अपुरे पडलेत, घरातील परिस्थिती बघता समजदार अल्पवयीन मुलगी रश्मी मिळेल ती मजुरी व मिळालेले घरकाम करून आई ला संसारात हातभार लावत सर्व सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होती मात्र नियतीला वेगळंच काही मंजूर असल्याने अल्पशा आजाराने व कमजोर आर्थिक परिस्थिती मुळे योग्य इलाजा अभावी रश्मी चा रविवारी पहाटे अचानक मृत्यू झाला.
अश्या कठीण समयी श्रीराम मंदिर समिती कुर्झा (विज्ञानगर) व कुर्झा विज्ञानगर वार्डातील सर्व सुसंस्कृत रहिवाशीयांनी आपुलकीने मदतीला धावत सामाजिक बांधिलकी जोपासत भानारकर कुटुंबाला आधार देण्याचा पुरेपूर प्रयत्न वार्डात पाहायला मिळाल्याने माणुसकीचं दर्शन संपूर्ण वार्डात घडले.