चंद्रपुर जिल्हात 22 वर्षिय नराधमांने केला 13 वर्षिय चिमुकलीचा विनयभंग.
त्रीशा राऊत,
चिमुर,भद्रावती प्रतिनिधी
Mo 9096817953
भद्रावती,दि.7 जुन:- चंद्रपुर जिल्हातील भद्रावती येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भद्रावती शहरातील चंडिकावार्ड येथे वास्तव्यात असणा-या 13 वर्षीय चिमुकलीच्या विनयभंग झाल्याच्या घटनेनंतर सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
13 वर्षिय चिमुकलीच्या विनयभंगा प्रकरणी नराधम आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव प्रदीप पत्रू राणे वय 22 वर्ष राहणार काटोल तुकुम असे आहे.
13 वर्षिय अल्पवयीन चिमुकली ही घरा बाहेर बसली असता प्रदीप राणे हा नराधम आपल्या दुचाकी मोटर सायकलने घराजवळ आला व तिला तुझ्याशी काही काम आहे असे म्हणून बाहेर बोलावले व तिचा हात पकडून ओढतान केली. या घटनेची माहिती घरच्यांना मिळताच त्याने या घटनेची तक्रार भद्रावती पोलीसांना दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच पास्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक करत आहे.