इसमावर रानडूकराचा हल्ला
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
वरोरा : काही दिवसांपूर्वी बिबट्याने वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावाच्या वसाहतीमध्ये अनेक व्यक्तींना दर्शन दिले होते. ही घटना ताजी असतानाच शहराच्या नजीक असलेल्या मोहबाळा रोडलगत असलेल्या वसाहतींमध्ये येऊन रानडुकराने एका व्यक्तीवर हल्ला केला. यात ती व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.
मोहबाळा गावाकडून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या राधानगरी परिसरात बंडू मरस्कोल्हे, रा. मोकाशी लेआउट वरोरा यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी होऊन घटनास्थळावर पडून राहिले. एका व्यक्तीने याची माहिती २४ तास सेवा ग्रुपला माहि दिली. घटनास्थळापर्यंत रुग्णवाहिका जात नव्हती. जखमी व्यक्तीस खाटेवर टाकून ग्रुपचे सदस्य अनिल निमकर, वासुदेव निखाडे, प्रफुल जांभुळकर, विठ्ठल टाले, प्रवीण ढगे, पवन अंड्रस्कर यांनी उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले..