बोरले जिथे कुंभे रस्त्याची दुरावस्था; २२८.९ लक्ष खड्यात.
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत :- बोरले जिथे कुंभे रस्ता म्हणजे पूर्वीचा (पेशवाई रस्ता) जो आंबिवली, नेरळ ते दामत गावापर्यंत व पुढे जातो. परंतु जिते कुंभे रस्त्याचे काम हे सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड वाशी नवी मुंबई यांनी सन २०२२ मध्ये पूर्ण केले व त्या रस्त्या साठी तब्बल २२८.९ लक्ष इतके खर्च केले आहेत.पण सध्या ह्याच रस्त्याची दुरावस्थाझाली आहे की एस.टी बस सेवा अशी चालत आहे की रस्त्यावर नव्हे तर समुद्रातून चातानाचा अनुभव जनतेला येत आहे.
काम पूर्ण झाल्यापासून ५ वर्षे या रस्त्याची निगा हि सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पहायची आहे पण. पाईप व मोऱ्या देखभाल दुरुस्तीची, रस्त्याच्या बाजू पट्ट्यावरील गवत झुडपे काढणे (पावसाळ्यानंतर एकदा), पावसामुळे पडलेल्या भेगांची दुरुस्तू करणे (आवश्यक असेल तेव्हा), डांबरी पृष्ठभागावरील खड्डे डांबरीने भरणे (आवश्यक असेल तेव्हा), रस्त्यालगतच्या गटारांची देखभाल व दुरुस्ती करणे (वर्षातून २ वेळा) पाईप मोरांची देखभाल दुरुस्ती करणे (वर्षातून २ वेळा), रस्त्यालगतचे दक्षता,अधिसूचना फलकांची देखभाल व दुरुस्ती करणे (आवश्यक असेल तेव्हा), पाईप मोऱ्यांच्या भिंती रंगवणे (वर्षातून २ वेळा) परंतु हे काम कुठेच झालेल्या दिसत नाही.
असा स्थानिकांनी आरोप केला आहे. ह्या गोष्टीला कुठेतरी कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अलिबाग रायगड व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था एम. आर. आर. डी. ए. ग्रामविकास व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचा वरद हस्त आहे असे हि आरोप होत आहे. तर ह्या मार्गावर पथ दिवे नाहीत शाळकरी मुली शाळा सुटल्यावर ह्याच रस्त्यावरून पाई प्रवास करतात त्याच्या जीवाचे बरे वाईटझाले तर ह्याला जबाबदार कोण? त्यात अपघाताची मालिका चालूच आहे म्हणून स्थानिक प्रशासनाला वारंवार तक्रारी करून सुद्धा हे काम का होत नाही म्हणून स्थानिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.