गोरेगांव मधे तळीरामांची भर रस्त्यात भरते मैफिल! पोलीस प्रशासनाला मोठी चपराक..

गोरेगांव मधे तळीरामांची भर रस्त्यात भरते मैफिल! पोलीस प्रशासनाला मोठी चपराक..

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- गोरेगांव प्रेम नगर पश्चिम मधे तळीरामांकडून कायदा सुव्यवस्थेचे धिंडोरे भर रस्त्यात काढण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा धाक राहिला नसून, उलट वरध हस्त असल्याचा प्रकार काहीसा गोरेगांव च्या प्रेम नगर मधे पहावयास मिळतो. कारण तिथल्या मध्यवर्ती ठिकाणात सुप्रीम बिअर शॉपी असल्याने,तळीराम तिथून बिअर खरेदी करून तिथेच ती पिण्यासाठी ठाण मांडून बसतात जणू काही ते गोवा मधे आहेत. मुख्य राहदारी व बाजाराचा रस्ता रस्ता असून तिथून हजारो नागरिक ये जा करत असतात, त्यात महिलांचा ही मोठा वर्ग आहे, त्यात असला किळसवाणा प्रकार पाहून महिलांना तोंड वळवून चालावं लागतं, तसेच लहान मुले सुद्धा याच रस्त्यावरून ये जा करत असतात, त्यामुळे त्यांच्या डोक्यावर हे चित्र पाहून काय परिणाम होईल, याची जाणीव तिथल्या पोलीस प्रशासनाला नसावी, म्हणून असे प्रकार दिवसा ढवळ्या नागरिकांना पहावयास मिळते.

दुसरी गोष्ट म्हणजे थोडं अंतर पुढे गेल्यावर मच्छी मार्केट समोरच वाईन शॉप आहे, तिथे सुद्धा असाच प्रकार पहावयास मिळतो, बिनधास्त पणे तळीराम हातात बॉटल्स व ग्लास घेऊन तिथल्या फुथ पाठ वरच बसलेले दिसतात, या सर्व प्रकारांना तिथले पोलीस जवाबदार आहेत असे बोलण्यात काही हरकत नाही, कारण कि तिथल्या वाईन शॉप व बिअर शॉपी वाल्यांवर कारवाई करायला गोरेगांव पोलीस प्रशासन असमर्थ आहेत हे यातून सिद्ध होत आहे. सुप्रीम बिअर शॉपी च्या बाजूला एक चायनीस फास्ट फूड आहे तिथे सुद्धा सर्रास तळीराम बॉटल घेऊन बसलेले असतात, आता त्या चायनीस फास्ट फूड वाल्याला कोणी परमिशन दिली, तिथे दारू पिण्यास, का तिथले पोलीस त्याच्यावर कारवाई नाही करत हा सध्या चर्चेचा विषय आहे. असे कित्येक गंभीर विषय आहेत गोरेगांव मधे, तिथे पोलीस प्रशासन पोहचतच नाही. गोरेगांव मधे कायदा व सुव्यवस्था राहिलीच नाही, असे म्हणायला वावगं ठरणार नाही, पोलीस प्रशासन फक्त हफ्ते घेण्यातच व्यस्थ आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नाही, कारण कि एवढी हिम्मत कोणीच करू शकत नाही, शिवाय पोलिसांच्या पाठबळमुळे. आता जनता सज्ञान झाली आहे, या पुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. असे प्रकार थांबले नाहीत तर गोरेगांव ची जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तिथल्या जनतेकडून देण्यात आला आहे, आता प्रेम नगर मधल्या अशा सर्व प्रकरणावर पोलिसांनी कडक कारवाई करून संबंधित तिथल्या चायनीज वाल्यावर, सुप्रीम बिअर शॉपी वर, आणि वाईन शॉप वाल्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मांगणी तिथले नागरिक करत आहेत. व तसं नाही झाल्यास तर तिथल्या पोलीस प्रशासनावरच कारवाई करण्यास गृह विभागाला भाग पाडू असे तिथले सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार श्री. पप्पू नायर यांनी संपूर्ण आढावा घेऊन माहिती दिली.