संतप्त नागपुर पोलिसांची तरुणाला बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
95275 26914
नागपूर,दि.8 जुलै:- नागपुर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका दारु पीलेल्या तरुणाची मोटरसायकल दुचाकी वाहनाला लागल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी त्या तरुणाला मोठ्या प्रमाणात बेदम मारहाण केली. त्या मारहाणी त्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुर जिल्हातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे मोठ्या लोकांत संतापाची भावना निर्माण हौऊन तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शहरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी पारडीच्या भवानी हॉस्पीटलमध्ये पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दि.7 जुलै रात्री 9.15 वाजताच्या सुमारास पारडी परिसरात मनोज हरिभाऊ ठवकर नामक तरुणाची दुचाकी पीएसआय शिंदे यांना कट मारून पोलिसांच्या गस्ती वाहनावर धडकली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी ठवकरला बेदम मारहाण केली. आधीच मद्य प्राशन करून असलेल्या ठवकरची प्रकृती यामुळे अस्वस्थ झाली. तो निपचित पडल्याचे पाहुन पोलीस हादरले. त्यांनी त्याला श्री भवानी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी ठवकरला मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त परिसरात कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि ठवकरचे नातेवाईक भवानी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. पोलिसांच्या मारहाणीमुळे ठवकरचा मृत्यु झाल्याचा आरोप करुन त्यांनी तेथे घोषणाबाजी सुरु केली. जमाव हजाराच्या संख्येत होता. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला.
ही माहिती कळताच पोलीस दलातील बहुतांश वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. त्यांनी कसेबसे जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ठवकरचा मृत्यु पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला त्यामुळे त्यांना तातडीने अटक करा, अशी मागणी करून जमावाने पोलिसांच्या नावाने शिमगा केला. तणाव वाढलल्याने अन्य पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस ताफा तसेच शिघ्र कृती दलाचे जवान हॉस्पीटलमध्ये बोलवून घेण्यात आले.